पुणे-भविष्यात विकास साधायचा असेल तर अणुऊर्जा हा एक महत्त्वाचा पर्याय असून, त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहाण्याची गरज असल्याचे मत ‘अग्निशिखा’ राष्ट्रीय परिषदेत व्यक्त करण्यात आले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल ङ्गिरोदिया विधी महाविद्यालयाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘भविष्यातील भारतासाठी अणुऊर्जा’ हा परिषदेचा विषय होता. डॉ. एस. एङ्ग. पाटील यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संपूर्ण जगाच्या तुलनेत आपल्या देशात लवकरच वीजटंचाईची समस्या जाणवणार आहे. ही गरज विचारात घेऊन अणुऊर्जा प्रकल्पांच्या विकासातील आव्हानांचा मुकाबला करणे आवश्यक आहे. अणुऊर्जा हा कमी खर्चातील, वापरात कमी धोकादायक आणि जोखीम नसणारा पर्याय असल्याचे मत ही नोंदविण्यात आले.
भाभा परमाणु अनुसंधान केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. चंद्रशेखर खराडकर, डॉ. जयंत गाडगीळ, डॉ. श्रीकांत परांजपे, डॉ. प्रियांका जावळे, डॉ. अपर्णा भिडे, डॉ. जे. सी. कपूर यांनी परिषदेत सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.
‘द न्यूक्लिअर सेफ्टी रेग्युलेटरी ऑथोरेटी बिल – २०११’ या कायद्याचे विश्लेषण करणार्या स्पर्धेचा बक्षिस समारंभ यावेळी संपन्न झाला. भारती विद्यापीठ विधी महाविद्यालयाच्या वैभल कर्पुर यांनी प्रथम क‘मांक मिळविला.
‘द न्यूक्लिअर सेफ्टी रेग्युलेटरी ऑथोरेटी बिल – २०११’ या कायद्याचे विश्लेषण करणार्या स्पर्धेचा बक्षिस समारंभ यावेळी संपन्न झाला. भारती विद्यापीठ विधी महाविद्यालयाच्या वैभल कर्पुर यांनी प्रथम क‘मांक मिळविला.

