आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रश्नावर अशोक चव्हाण यांचे उत्तर
पुणे,- सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, नांदेड, पानशेत, वेल्हा परिसरात रखडलेल्या रस्त्यांच्या कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता आणि गुणतपासणी विभागाकडून तपासणी करून, कामाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत केली. आमदार माधुरी मिसाळ यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला चव्हाण उत्तर देत होते.
हायबि‘ड ऍन्युइटी योजनेअंतर्गत सिंहगड रस्त्यावरील विविध ठिकाणी ७६ किलोमीटर रस्त्यांची विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी २२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु दीड वर्षानंतर केवळ ३० टक्के कामे झाली आहेत. संथगतीने सुरू असलेली कामे आणि कामांचा निकृष्ट दर्जा याबाबत आमदार मिसाळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मिसाळ पुढे म्हणाल्या, ’ठिकठिकाणी खोदकाम केल्याने परिसरातील नागरीक श्वसनाच्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. सिंहगड कि‘ा आणि पानशेतकडे जाणार्या प्रवाशांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. कामाची गती संथ असून, अधिकृत ठेकेदाराने पोट-ठेकेदाराला काम दिल्याने कामाचा दर्जा निकृष्ट झाला आहे.‘
चव्हाण पुढे म्हणाले, ‘सप्टेंबर २०२० पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु विविध सेवावाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठी लागणार्या वेळामुळे कामाची गती संथ झाली आहे. ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याप्रमाणे मुदतीत काम होईल की नाही हे बारकाईने तपासावे लागेल. विकासकामांना वेग देण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येईल.

