राज्यातील मेट्रो प्रकल्प दहा वर्षातच पांढरे हत्ती ठरतील – जयंत पाटील

Date:

पुणे-नागपूरमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली परंतु सध्या जर परिस्थिती पाहिली  तर त्या मेट्रो चा उपयोग अतिशय कमी लोक करतात  हीच परिस्थिती इतर ही शहरांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल. पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या मेट्रो या दहा वर्षातच पांढरे हत्ती ठरते आणि त्याचा बोजा राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेवर पडेल असे मत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे नृसिंह  उर्फ राजाभाऊ चितळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘भारतीय अर्थव्यवस्थेतेतील महाराष्ट्राचे योगदान’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद  कुंटे, बृहनमहाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य चंद्रकांत रावळ आदी यावेळी उपस्थित होते
पाटील म्हणाले इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये आजही वेगाने आर्थिक परिस्थिती सुधारत आहे ती अधिक वेगाने सुधारण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे गरजेचे आहे. यासाठी औद्योगिक धोरणामध्ये सुसूत्रता आणणे, उद्योजकांना वीज दर कामगार वेतन यामध्ये सवलत देणे तसेच स्थानिक राजकारण्यांकडून गुंतवणूकदारांना देण्यात येणारा त्रास कमी केला पाहिजे यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे
ज्या राज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा राज्यांना केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येते परंतु जी राज्य स्वतःच्या बळावर विकसनशील झाली आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रगती झाली आहे अशा राज्यांना मात्र त्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत नाही हा दुजाभाव कमी करण्यासाठी राज्याची कामगिरी लक्षात घेऊन त्या राज्यांना मदत केली पाहिजे यासाठी केंद्रीय बजेट सादर करताना मागच्या वर्षी या बजेटमधून कोणत्या प्रकारचे रिझल्ट मिळाले त्यानुसार आऊटपुट बजेटही मांडण्यात आले पाहिजे असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
प्रीती राजगुरू यांनी सूत्रसंचालन, प्राचार्य डॉ. रावळ यांनी प्रास्ताविक, डॉ. आसमा शेख यांनी परिचय, आणि इंद्रनील चितळे यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बाई पण भारी देवा’ स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा कार्यक्रम

तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे१ मार्च रोजी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन पुणे, दि.२४...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास स्ट्रीम फेस्ट अल्ट्रा झकास...

लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा!:जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी...