पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय आणि डीईएस सेकंडरी स्कूल यांच्या वतीने जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणार्या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते.
‘जर करायचे असेल सुखी जीवन तर करु नका तंबाखूचे व्यसन’, ‘धुराची वलये काढा तोंडातून गोलगोल त्यामुळे जीवन होईल मातीमोल’, ’तंबाखूला द्या नकार जीवनात होईल आनंद होईल साकार’ अशा आशयाची घोषवाक्ये प्रदर्शित करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन न करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
आदर्श जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे. दुर्दैवाने हा आजार झाल्यास सकारात्मक दृष्टिकोनातून त्याचा यशस्वी सामना करता येतो. असे मत एअर मार्शल (निवृत्त) अजित वैद्य यांनी यावेळी व्यक्त केले. श्री. वैद्य कर्करोगातून पूर्णपणे बरे झाले असून, त्याबाबत जनजागृतीचे कार्य करीत आहेत.
सोसायटीच्या आजीव सदस्या डॉ. सविता केळकर यांनी मार्गदर्शन केले. डीईएस सेकंडरी स्कूलच्या मु‘याध्यापिका ज्योती बोधे यांनी प्रास्ताविक आणि मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या मु‘याध्यापिका लीना तलाठी यांनी आभार प्रदर्शन केले.