डीईएस प्रायमरी स्कूलमध्ये सामाजिक भोंडला
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्रायमरी स्कूलमध्ये सामाजिक भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. भोंडल्याच्या पारंपरिक गीतांऐवजी एक अक्षर लिहू…दोन अक्षर लिहू….पाचा अक्षरी परमेश्वर, आज कोण वार…आज आहे सोमवार…स्वच्छता अभियान राबवू या…परिसर स्वच्छ ठेवूया अशी आधुनिक काळाला सुसंगत भोंडल्याची गाणी गाऊन ङ्गेर धरण्यात आला.
वैज्ञानिक दृष्टिकोन, साक्षरता, स्वच्छता अभियान, वाहतुकीचे नियम पाळा, पर्यावरण रक्षण, बेटी बचाओ, स्त्री भ‘ूण हत्या, ग‘ाम विकास, शौचालयाचा वापर करावा, अस्वच्छतेतून होणारे आजार याबाबत जनजागृती करणारे सामाजिक संदेश देणार्या गीतांचा समावेश होता. याशिवाय मुलांना पौष्टिक व सकस आहाराचे सेवन करावे, जंक ङ्गूड टाळावे यासाठी विशेष गीताची रचना करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांनी संकलित केलेली पुस्तके निवारा वृध्दाश्रमाला भेट देण्यात आली. वनवासी कल्याण आश्रमाला तुरडाळ भेट देण्यात आली. गायत्री जवळगीकर, सिमा हणमंते, किर्ती देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मु‘याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सिमरन गुजर यांनी आभार मानले. ग‘ेसी डिसोझा, अंजली शेवाळे, मुग्धा श्रीखंडे, हर्षदा कारेकर, सुनेत्रा वेदपाठक यांनी संयोजन केेले. पालक संघाचे विशेष सहकार्य लाभले.
‘चला भारत घडवूया’ बीएमसीसीत पथनाट्य
– स्वदेशीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मेक इन इंडिया कार्यक‘माअंतर्गत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) अकरावीच्या विद्यार्थ्यांनी ‘चला भारत घडवूया’ हे पथनाट्य सादर केले. यावेळी ‘मेक इन इंडिया’ या विषयावरील माहितीपट दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते ङ्गेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. उपप्राचार्य जगदीश लांजेकर, डॉ. आशीष पुराणीक, श्री. नायकवडी, प्राध्यापिका रुपाली देशपांडे यांनी कार्यक‘माचे संयोजन केले.