माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील अभिनव कल्पनेतून साकारलेला उपक्रम म्हणजे ‘‘जोडी तुझी माझी’’

Date:

पुणे -शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पनाताई धालेवाडीकर यांच्या अभिनव कल्पनेतून साकारलेला उपक्रम म्हणजे ‘‘जोडी तुझी माझी’’ हा कार्यक्रम ४ ते ६ ऑक्टोबर मध्ये संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. पालकांनी या कार्यक्रमाचा हाच हेतू होता.
दि. ४/१०/२०१८ या दिवशी खेळगट ते वरिष्ठ गट या गटाला परिक्षक म्हणून सौ. सई हातेकर व सौ. स्वाती जोशी लाभल्या होत्या. मुलांनी त्या त्या वयोगटानुसार गाणी सादर केली. त्यामध्ये अभंग देशभक्तीपर गीत, भजन, बालगीत इ. गाण्योचा समावेश होता.
दि. ५/१०/२०१८ या दिवशी परिक्षक म्हणून लाभलेल्या सौ. विदुला संत व सौ. पल्लवी जोगळेकर होत्या. ही स्पर्धा पाहण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष . शरद कुंटे  उपस्थित होते.
दि. ६/१०/२०१८ या दिवशी ५वी ते ७वी चे परिक्षक म्हणून श्री. जीवन धर्माधिकारी व श्री. अभिजित पंचभाई उपस्थित होते. या परिक्षकांनी मुलांच्या गाण्याचे कौतुक करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सदस्य  सौ. सविता केळकर उपस्थित होत्या.
याच दिवशी बक्षीस समारंभ शाळेच्या नवीन इमारतीत संपन्न झाला. सुरुवातीला राग शंकरामधील ‘ईशस्तवन’ मुलांनी सादर केले. सौ. कल्पनाताईंनी सर्वांसमोर मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की आईबाबांनी पाल्याची व आई बाबांची त्यांच्या पाल्याने छान तयारी करुन घेतली. श्री. विकास दिग‘सकर सर तीन दिवसांचे अहवाल वाचन केले. यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्र‘यात गायिका सौ. अनुराधा कुबेर उपस्थित होत्या. त्यांनी रागातील बंदिश सादर केली.. डॉ. भंडगे सरांनी एक गाणे गाऊन शाळेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. पंचभाई यांनी ‘आकाशी झेप घेरे पाखरा’ हे गीत सादर केले. गायकाने कसे असावे हे सांगितले. श्री. कपलानी यांनी असे व्यक्त केले की असे उपक्रम राबविल्याने मुलांच्या भावना समृद्ध होतात.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.  
मा. स. गोळवलकर गुरूजी विद्यालयात प्लास्टीक मुक्ती अभियान संपन्न महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशालेत प्लास्टीक मुक्ती अभियान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत मॉडर्न हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी प्लास्टीकच्या वापरामुळे होणार्‍या दुष्परीणामांची जाणीव पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांना करून दिली.
कार्यक्रमाची सुरुवात व आभार प्रदर्शन  प्रशांत जाधव यांनी केले. तर पथनाट्यामधील विद्यार्थ्यांना पुस्तके देवून त्यांचे कौतुक प्रशालेच्या मु‘याध्यापिका सौ. लिना तलाढी यांनी केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...