पुणे, ता. ३ ः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने (बीएमसीसी) आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालय सरपोतदार करंडक प्रसंगनाट्य स्पर्धेत पुणे विद्यार्थी गृहाच्या कॉलेज ऑङ्ग इंजिनिअरिंगच्या ‘हुकुमावरून’ने विजेतेपदाची मोहोर उमटवली. भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाने दुसरा क‘मांक मिळविला.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे
पहिला ः पुणे विद्यार्थी गृहाचे कॉलेज ऑङ्ग इंजिनिअरींग
दुसरा ः भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय
उत्कृष्ट संकल्पना ः स. प. महाविद्यालय
दिग्दर्शन
पहिला ः संदेश पवार (पीईएस मॉडर्न)
दुसरा ः जय येडलेवार (सीओईपी)
पुरुष अभिनय
पहिला ः सुशांत जंगम (स. प.)
दुसरा ः मयूर बच्छाव (एसएओई)
उत्तेजनार्थ ः अक्षय सरवदे (भिवराबाई सावंत अभियांत्रिकी कॉलेज)
स्त्री अभिनय
पहिला ः साक्षी गाठे, श्वेता बराबडे (सीईओपी)
दुसरा ः स्वाती भिंगारदिवे (आबासाहेब गरवारे महाविद्यालय)
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. आशीष पुराणीक, स्मिता शेट्टी, गौरी कांगो यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. अभिनेता आलोक राजवाडे व सायली ङ्गाटक यांनी परिक्षण केले.
विश्वासराव सरपोतदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेली १८ वर्षे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी २८ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. मनाली जामकरने सूत्रसंचालन केले, मंदार नेने यांनी परिचय करून दिला, शुभम गिझे यांनी आभार मानले.

