पुणे- भारतीय संस्कृृतीचे अभ्यासक देवदत्त अनगळ यांच्या संग‘हातील देशविदेशातील गणेश मुर्तींचे प्रदर्शन शुक‘वार, दिनांक १४ सप्टेंबर ते रविवार दिनांक १६ सप्टेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते शुक‘वारी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
प्रदर्शनात भारतीय उपखंडातील कंबोडिया, नेपाळ, इंडोनेशिया, अङ्गगाणिस्तान, थायलंड, ब‘म्हदेश या देशांतील वैशिष्ट्यपूर्ण गणेश मुर्ती पाहायला मिळणार आहेत. आठव्या शतकापासून आजपर्यंतच्या मुर्त्यांचा समावेश आहे. सोने, चांती, तांबे, पितळ, जस्त, हस्तिदंत, प्राचीन दगड व मातीपासून बनविलेल्या या मुर्तींचा आकार दोन सेंटीमीटरपासून २ ङ्गूटांपर्यंत आहे.
त्रिशुंड गणेश, पंचमुखी गणेश, दोन हातांपासून बारा हात असणारे गणेश, वामन अवतारातील गणेश, लहान मुलांच्या स्वरूपात विविध लीला करणारे गणेश, वाद्ये वाजविणारे, विविध पेहरावातील गणेश अशी गणेशाची विविध रुपे अनुभवता येतील. अंगकोर हे जुन्या काळातील राज्यामधील प्रचलित असणारे नाणे आणि इंडोनेशियामधील चलनी नोटेवरील गणेश प्रतिमा प्रदर्शनात पाहाता येणार आहेत. ४०० मुर्ती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत

