पुणे- देशातील सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती गुंतागुंतीची आहे. अंतर्गत समस्यांबरोबर राष्ट्रीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा कठीण वेळी राष्ट्रीयत्व, भविष्यातील समाजरचना, सामाजिक समरसता याबाबत शिक्षकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. म्हणूनच समाज शिक्षकांकडे आशेने बघत आहे. पीढी घडविण्याचे काम शिक्षकांना करायचे आहे. असे विचार सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका स्मिता करंदीकर, राज्य सरकारचा आदर्श मु‘याध्यापक पुरस्कार प्राप्त एकनाथ बुरसे आणि आदर्श कलाशिक्षक पुरस्कार मिळविणारे मोहन देशमुख या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षकांचा गौरव करताना प्रभुणे बोलत होते. सोसायटीच्या नियामक मंंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. संचालक डॉ. प्राची साठे, डॉ. सुनील भंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी प्रास्ताविक केले. वंदना घांगुर्डे यांनी आभार मानले. डॉ. सविता केळकर यांनी सूत्रसंचालन केले.