पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने भारतीय संस्कृती आणि विविध प्रातांतील वारसा जतन करण्यासाठी आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन ‘अस्तित्व’ स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील ६० महाविद्यालयांतून पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.
सुप्रसिध्द शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. नोकरीमुळे पोटापाण्याचा प्रश्न सुटतो आणि कला जीवनाचा अर्थ सांगते. त्यामुळे अभ्यासाबरोबर एक तरी कला जोपासा. त्यातून समाधान मिळेल. संगीताच्या श्रवणाने आजच्या कॉर्पोरेट जगात निर्माण होणार्या ताणतणावांपासून मुक्त होता येते. त्यासाठी गाणे म्हणता आले नाही, तरी ते नियमितपणे ऐका. भारतीय संस्कृती आणि कलेचा वारसा महत्वाचा आहे. असे मत श्री. भाटे यांनी व्यक्त केले. सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंठे कार्यक‘माचे अध्यक्ष होते.
विद्याथ्याचे कला गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी सन २०१० पासून ‘अस्तित्व’चे आयोजन करण्यात येते. भारताचा समृध्द वारसा, वैभवशाली परंपरा, प्राचीन संस्कृती यांचे जतन, संवर्धन करणे आणि ती नवीन पीढीकडे पोहोचविणे हा या उपक‘माचा मु‘य उद्देश आहे. पारंपरिक छंद आणि आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाचा योग्य तो समतोल राखण्यात येतो. या वर्षीची संकल्पना पर्यावरणविषयक होती त्यामध्ये कमी करा, पुनर्वापर करा आणि पुर्नप्रकि‘या यावर विद्यार्थ्यांनी कला सादर केल्या. अशी माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी दिली.
नृत्य, वाद्य वादन, पेंटिंग, स्केचिंग, छायाचित्रण, प्रश्नमंजुषा, निबंध, लोगो तयार करणे, ङ्ग‘ूट कार्निव्हल आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक प्रसंग, महाराष्ट्र, भारतीय शिल्पकला, पु. ल. देशपांडे, प्लॅस्टिक मुक्ती, चाणक्य, समाजमाध्यमे, भारतीय पुरातत्व, भारतीय समाजासाठी भारतीय शिक्षणाची गरज असे स्पर्धेसाठी विविध विषय निवडण्यात आले होते.
प्राचार्य चंद्रकांत रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. आशीष पुराणीक, डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. राजश्री गोखले, प्रा. वृषाली महाजन, प्रा. अनघा काळे यांनी कार्यक‘माचे संयोजन केले.
5 Attachments