पुणे-न्यू इंग्लिश स्कूल- रमणबाग प्रशालेत बहुआयामी तासिकेत जाणता राजा या महानाट्यातील निवड नाट्यप्रसंग प्रशालेतील शिक्षक-सेवक व विद्यार्थी यांनी सादर केले.
महाराजांच्या आयुष्यात अनेक पहाडासारखी महाकाय संकटे आली परंतु ते डगमगले नाहीत. कधी शक्तीने तर कधी युक्तीने, गनिमी काव्याने त्यांनी संकटांना व शत्रूला परास्त्र केले. शिवरायांनी असे मावळे घडवले ‘जो रुकते नही, थकते नही और बिकते भी नही’ स्त्री ही मराठ्यांच्या देव्हार्यातील देवता आहे. पैसे खाणार्यांचं नांत असतं गिधांडांशी, माणसांशी नव्हे अशा अनेक भाव गर्भित संवादातून ह्या महानाट्याने मनोरंजनाबरोबर विद्यार्थ्यांना शिवसंस्काराचा वारसाचा दिला.
श् राजेंद्र पवार, सुनिता खरात, गणपत लांघी, दिगंबर सावरमाळे, अतुलदळवी, चंद्रशेखर कोष्टी यांनी प्रभावी अभिनयाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. सदर कार्यक‘माची संकल्पना रविंद्र सातपुते यांची होती.
कार्यक‘मास प्रशालेच्या मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी, उपमु‘याध्यापिका जयश्री रणखांबे, पर्यवेक्षक कोलते रजनी व जगन्नाथ जाधव यांचे मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी वृंद उपस्थित होता.

