पुणे-न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत दर शनिवारी सादर होणारी बहुआयामी तासिका म्हणजे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्वाची जडण-घडण नाट्य, गायन, वादन, वक्तृत्व, व्याख्याने इ. विविध माध्यमांतून करणारी पर्वणीच होय.
आजच्या बहुआयामी तासिकेत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या हेतूने प्रशालेच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख, नाट्यकर्मी शिक्षक श्री. रविंद्र सातपुते यांनी प्रसिध्द लेखक श्री. व्यंकटेश माडगूळकर यांची ‘भानाचे भूत’ ही कथा हृदयीस्पर्शी नाट्यवाचनाद्वारे सादर केली. प्रभावी वाचनातून त्यांनी कथेतील अदृश्य पात्रे, त्यांच्या भावभावना, व्यक्तींच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे साक्षात विद्यार्थी श्रोत्यांसमोर जीवंत उभे केले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आंतरवर्गीय नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रभावी वाचन कसे असावे याचा वस्तुपाठच आजच्या सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना मिळाला असे म्हणून श्री. सातपूते सर, नाट्यवाचनास संगीत साज चढवणार्या होनराज मावळे, मुकुंद कोंडे व स्वप्नील कुंभार या विद्यार्थ्यांचे कौतुक प्रशालेच्या शालाप्रमुख मा. शितलोत्तम रेड्डी यांनी केले. कार्यक‘मास उपमुख्याध्यापिका श्रीम. जयश्री रणखांबे, पर्यवेक्षक श्री. जगताप जाधव, सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

