पुणे – अॅट्रॉसिटी कायद्याच्या संरक्षणासह विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात रविवारी संविधान सन्मान मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला . सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्ते आणि नागरिक ,महिला मुले या मोर्चात सहभागी झाली होती .डेक्कन परिसरातील संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान वाचन करून या मोर्चाला सुरुवात झाली . लकडी पुलावरून लक्ष्मी रस्ता, संत कबीर चौक, पावर हाऊस, लाल देऊळ, कॅम्प परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला .
हा पहा या मोर्चाचा प्रारंभ (व्हीडीओ )
संविधान सन्मान मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद -प्रारंभ व्हिडीओ पहा …
Date:

