पुणे-सण आणि श्रद्धा यांचा अनोखा मिलाप भारतीय संस्कृतीत अजूनही घरोघरी अनुभवायला मिळतो .हल्ली दिवाळीत पर्यटनस्थळे गजबजवून टाकणारी मंडळी दिसू लागली तरीही अपरंपार श्रद्धा येथे चिरकाल राहणार असल्याची ग्वाही पावलोपावली मिळते . दिवाळीचा सण आणि ईश्वराचे मनोभावे स्मरण या दोन्ही गोष्टींची घरात,मनात आणि देवळात देखील आनंदाने उधळण होत आली आहे . एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणाधीशाच्या मंदिरात हि आनंदाची आणि भक्तिभावाची उधळण करतो आहे . या निमित्त या मंदिराची करण्यात आलेली हि सजावट पहा …..