पुणे :
‘श्रीकृष्ण मित्र मंडळ ट्रस्ट’च्या वतीनेसिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या पोलिस मित्रांसाठी शंभर टी-शर्ट भेट देण्यात आले. यावेळी पोलिसांवर होणार्या भ्याड हल्ल्यांचा निषेध करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी पोलिस निरीक्षक विष्णू जगताप, मंडळाचे अध्यक्ष युवराज झगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन हर्षल झगडे यांनी केले होते.
‘पोलिस आणि मंडळांनी एकत्र येऊन उत्सवात कायदा -सुव्यवस्था राखावी’ असे आवाहन हर्षल झगडे यांनी केले.‘श्रीकृष्ण मित्र मंडळ ट्रस्ट’च्या वतीनेदरवर्षी अनेक सामाजिक जनजागृतीपर संदेश देणार्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते,’ असे संयोजकांंनी सांगितले.
कार्यक्रमप्रसंगी पोलिस निरीक्षक विष्णू जगताप, मंडळाचे अध्यक्ष युवराज झगडे, हर्षल झगडे, चंदन कड, धनंजय पाटील, संतोष हनमघर, दिपक गाढवे, किशोर बुरटे, विनायक पैलवान, चिन्मय जगताप, मनोज आटोळे, अमित श्रीवास्तव, गणेश शिलोत, मयूर वैरागकर, अनिकेत जगताप, महेश ढेबे, प्रणव नवले, लोकेश पटेल, मंदार दारवटकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. हर्षल झगडे यांनी आभार व्यक्त केले.

