नवी दिल्ली/ मुंबई- मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. शिवसेना खासदारांचा नोटाबंदीच्या विरोधात सूर दिसताच मोदींनी त्यांना चांगलेच सुनावले.
‘मी जेव्हा वर जाईन, तेव्हा बाळासाहेबांना ठामपणे सांगू शकेन की मी देशात चांगले काम करुन आलो आहे, तुमच्यात हे धाडस आहे की नाही, हे माहीत नाही’, अशा शब्दात मोदींंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावले.
पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेच्या खासदारांना कडक शब्दात सांगितले कि, मी बाळासाहेबांना वर जाऊन माझ्या चांगल्या कामांची ग्वाही देईन पण तुम्ही काय सांगणार? मोदींचा हा प्रश्न शिवसेनेच्या जिव्हावर लागला आहे. यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना काही प्रश्न केले आहेत. “देशात चलनाची चलबिचल सुरु आहे. सामान्य माणूस रांगेत उभे राहून थकला आहे. या सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देशाचे पंतप्रधान म्हणून आधी त्यांच्याकडून अपेक्षित आहेत. ती जर उत्तरे सर्व सामान्य जनतेला मिळाली आणि त्यांचे जीवनमान सुरळीत झाले तर बाळासाहेबांनासुद्धा जास्त आनंद होईल.” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे पैसे असलेल्या जिल्हा बँकांवर काही निर्बंध आहेत.