पुणे-केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढ व पेट्रोल दरवाढीच्या विरोधात पुणे शहर शिवसेनेच्या वतीने नवीपेठ येथील पेट्रोल पंप ते वैकुंठ स्मशानभूमी पर्यंत घरगुती गॅस सिलिंडरचे प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली .याप्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे, शहर संघटिका पल्लवी जावळे,संगीता ठोसर, शर्मिला येवले,नगरसेवक बाळा ओसवाल, प्रशांत राणे, तानाजी लोणकर,भरत कुंभारकर,राजेंद्र शिंदे,राजेंद्र बाबर,महेश पोकळे,गजानन पंडित,प्रवीण डोंगरे,उमेश वाघ,चंदन साळुंके,उमेश गालिंदे, प्रसाद काकडे,अमर मारटकर, नागेश खडके,अमोल घुमे, नंदू येवले,नितीन रावळेकर,गणपत साळुंके, निरंजन कुलकर्णी,दिनेश पोटे,मनीष बासू,राहूल जेकटे,राजू चव्हाण,राम बाटुगे,अजय परदेशी, अमृत पठारे,जयश्री भणगे,छायाताई भोसले,श्रुती नाझीरकर,वैशाली दारवटकर, प्रज्ञा लोणकर, सुनीता खंडाळकर युवती सेनेच्या रेणुका साबळे निकिता भोसले, गायत्री गरुड, गणेश घोलप, युवराज पारीख, सनी गवते,मकरंद पेठकर आदी शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते .
यावेळी संजय मोरे म्हणाले,’केंद्रातील भाजपाचे सरकार याने 2019 च्या निवडणुकीच्या उद्देशाने उज्वला घरगुती गॅस योजना राबवली. या योजनेअंतर्गत मोफत गॅस म्हणून रू. 350/- घेउनच कनेक्शन देण्यात आले. याचा डंका पिटण्यात आला, भारतातील गृहिणींना मोठमोठ्या जाहिराती मार्फत असे दाखवण्यात आले की तुमच्या डोळ्यातील अश्रू आम्ही पुसले आहेत. घरगुती गॅस वर स्वयंपाक करू शकता, मोदी व सरकार मधील मंत्री व त्यांचे अंधभक्त मोदी सरकार हे गरिबांचे कैवारी आहेत असा डंका वाजवू लागले. परंतु निवडणूका जिंकल्यानंतर थोड्याच दिवसात गॅस वरील सबसिडी रद्द करून गॅस कनेक्शन दिले, परंतु घरगुती गॅस सिलिंडरची सबसिडी काढून टाकली. यामुळे भारतातील जनतेला कळाले की हे सरकार गरीबांचा कैवारी नसून गरिबांची फसवणूक करणारे सरकार आहे, कारण या घरगुती गॅस ची किंमत तीनशे ते पाचशे च्या दरम्यान होती ती किंमत आज रू 952/- अधिक डिलिव्हरी चार्जेस 30/- रू असे 982/- रू पर्यंत केले. अशाप्रकारे गॅस शेगडी देऊन चूल विझवली व अश्रू पुसले म्हणणारे प्रत्यक्षात केंद्र सरकारने वेळोवेळी गॅस दरवाढ करून सामान्य जनतेच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आणले. आज चूल पेटवण्यासाठी जनता घरगुती गॅस देखील विकत घेऊ शकत नाही. अशी अवस्था केंद्र सरकारने केली आहे. सर्वत्र महागाईचा भस्मासुर या भाजप सरकारच्या काळात झाला आहे.पाच राज्याची निवडणूक विचारात घेऊन भरमसाठ झालेली इंधन दरवाढ निवडणुकीपर्यंत थांबवण्यात आली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच आधीच भरमसाठ झालेली इंधन दरवाढ पुन्हा पुन्हा वाढवण्यात आली या भाजप सरकारचा कारभार म्हणजे जनतेची वेळोवेळी करण्यात येणारी फसवणूकच आहे.गरज सरो वैद्य मरो या म्हणीप्रमाणे केंद्रातील विद्यमान राज्यकर्ते धोरण राबवतात राजकीय फायदा बघून दर वाढ थांबवली जाते लोकांकडून मतं मिळवली जातात. एकदा मते मिळाली की पुन्हा दरवाढ केली जाते. अशाप्रकारे दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा शिवसेना वेळोवेळी जनतेसाठी आंदोलना मार्फत निषेध करत असते. यामुळेच केंद्र सरकारच्या विश्वासघाताचा निषेध करण्यासाठी शिवसेना पुणे शहर च्या वतीने घरगुती गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
गॅस व पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
Date:

