निर्माती-दिग्दर्शक फराह खान सध्या स्टार प्लस वर ‘लिप सिंग बॅटल’ हा रिएलिटी शो होस्ट करतेय. ह्या शोसाठी बॉलीवूडच्या मोठ-मोठ्या सेलिब्रिटींची हजेरी शोवर लागलेली आहे. नुकतीच ह्या आगळ्या-वेगळ्या रिएलिटी शोवर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुखने हजेरी लावली होती. इथे येऊऩ शिल्पा आणि रितेशने आपल्या खास अंदाजात झिंगाट डान्स करून खूप धमाल उडवली. आणि शो अधिकच मनोरंजक झाला.
शोमधल्या सूत्रांनुसार, झिंगाट गाण्यावर डान्स केल्यावर रितेश देशमुखने लिप सिंग बॅटलचं चॅलेंज घेत, मिथुन चक्रवर्तींच्या ‘जीते हम शान से’ चित्रपटातल्या ‘जुली जुली’ गाण्यावर परफॉर्मन्स दिला. मिथुनदाच्या गेटअपमध्ये मिथुनदा स्टाइलमध्ये परफॉर्म करून रितेशने प्रेक्षकांची मनं जिंकली.
एवढंच नाही, तर शिल्पा शेट्टीनेही लिप सिंग बॅटलचे चॅलेंज घेत, अमिताभ बच्चन ह्यांचा गेटअप केला. आणि बिग बींच्या ‘हम’ चित्रपटातल्या लोकप्रिय ‘जुम्मा चुम्मा दे दे’ ह्या गाण्यावर परफॉर्म केले. शिल्पा शेट्टी महानायक अमिताभ बच्चन स्टाइलमध्ये डान्स करत असतानाच फराह खान बनली किमी काटकर. आणि दोघींनी मिळून ह्या ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावर परफॉर्म करून धमाल उडवून दिली. त्यामुळेच आता हा शो जेव्हा टीव्ही वर प्रेक्षिपत होईल, तेव्हा नक्कीच लोकांना हा शो पाहताना खूप मजा येईलं.

