नवी दिल्ली-‘लोकांना होत असलेला त्रास लक्षात घ्या. मुर्खांच्या नंदनवनात वावरणे बंद करा’, अशा शब्दांत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नोटाबंदी आणि नमो अॅपच्या माध्यमातून होणार्या सर्वेक्षणावर टीका केली आहे.
भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीकोणाचाही नामोल्लेख न करता नोटाबंदीच्या निर्णयावर हल्ला चढवला आहे. नोटाबंदीवर ‘नमो अॅप’च्या माध्यमातून घेण्यात आलेला सर्व्हे ‘पूर्वनियोजित ‘ असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
‘लोकांना होत असलेला त्रास लक्षात घ्या. मुर्खांच्या नंदनवनात वावरणे बंद करा’, अशा शब्दांत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी टीका केली. शिवसेनेकडूनही या निर्णयाच्या चुकलेल्या अंमलबजावणीवर वारंवार तोफ डागली जात आहे. सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधत घरचा आहेर दिला आहे. सिन्हा यांनी पंतप्रधानांचा नामोल्लेख टाळून नमो अॅपच्या माध्यमातून नोटाबंदीवर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणावर टीका केली आहे.या सर्वेक्षणात ९३ टक्के लोकांचे नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन असल्याचा दावा करण्यात आला आहे. तोच धागा पकडून हे प्लांटेड सर्वेक्षण व्यक्तिगत स्वार्थासाठी करण्यात आल्याचा आरोप सिन्हा यांनी केला आहे. ‘माता-भगिनींनी अनेक वर्षांच्या कष्टाने आपल्या भविष्यासाठी कमावलेल्या पैशाची तुलना काळ्या पैशाशी केली जाऊ नये, अशी अपेक्षाही सिन्हा यांनी ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.