पुणे, 24 एप्रिल 2022: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज चॅम्पियनशीप सिरीज 18वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत शताक्षी दरेकर, आस्मि आडकर, अवंती वाघ या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत छत्तीसगढच्या संप्रित शर्माने अर्णव बनसोडेचा 6-2, 6-0 असा तर, रोहित पाटीदारने दिव्यांक कवीतकेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरी गाठली. पुण्याच्या सिद्धार्थ मराठे याने अनिकेत चौबेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. मुलींच्या गटात अस्मि आडकरने काव्या देशमुखला 6-0, 6-0 असे पराभूत केले. शताक्षी दरेकरने दुर्गा बिराजदारचा 6-0, 6-3 असा पराभव केला.
निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:.संप्रित शर्मा(छत्तीसगढ)वि.वि.अर्णव बनसोडे(महा) 6-2, 6-0;रोहित पाटीदार(महा)वि.वि.दिव्यांक कवीतके(महा)6-3, 6-2;अयान गिरधर(महा)वि.वि.यश पोळ(महा) 6-1, 6-2;सिद्धार्थ मराठे(महा)वि.वि.अनिकेत चौबे(महा)6-0, 6-0;पियुश जाधव(महा)वि.वि.पार्थ काळे(महा)6-4, 6-3;
मुली:अस्मि आडकर(महा)वि.वि.काव्या देशमुख(महा)6-0, 6-0;प्रतिष्ठा सैनी(महा)वि.वि.यागस्मिनी चक्रवर्ती(महा) 6-3, 6-0;अवंती वाघ(महा)वि.वि.काव्या पाटणी(महा)6-1, 6-0;शताक्षी दरेकर(महा)वि.वि.दुर्गा बिराजदार(महा) 6-0, 6-3;
18 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत शताक्षी दरेकर, आस्मि आडकर यांची आगेकूच
Date:

