पुणे, ज्येष्ठ चित्रकार शशिकांत बने यांनी कॅनव्हासवर तैलरंगाने साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत भोसलेनगर येथील इंडियाआर्ट गॅलरीत भरविण्यात आले असल्याची माहिती संचालक मिलिंद साठे यांनी कळविली आहे.
साधी राहाणीमान असणार्या, कष्टमय जीवन जगणार्या आणि सौंदर्यवान महिलांची चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. शेतात काम करणार्या, मुलांचे संगोपन करणार्या, बाजारात मासे विकणार्या आणि दैनंदीन जीवनात विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या महिलांच्या १५ व्यक्तिचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे.
परशूरामाची भूमी म्हणून ओळख असणार्या रत्नागिरीत बने यांचे बालपण गेले. त्यांचे कलाशिक्षण कोल्हापूरात आणि नंतर मुंबईत झाले. कोल्हापुरातील नामवंत चित्रकार गणपतराव वादंगेकर, आर. एस. गोसावी, रविंद्र मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली बने यांची चित्रकला समृध्द होत गेली. चित्रकार दत्ता परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केलेले प्रभावी रेषांचे तंत्र हे बने यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. व्यक्तिचित्रांसाठी वैविध्यपूर्ण रंगांचा वापर केला आहे. सकाळी ११ ते रात्री ८ प्रदर्शनाची वेळ आहे.
शशिकांत बने यांच्या व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन
Date:

