पुणे- सहकारनगर मध्ये शारदाबाई पवार कला महोत्सावाचा काल तिसऱ्या दिवशी प्रसिध्द गायक महेश काळे यांच्या सुश्राव्य गायनाने समारोप झाला .
राष्टवादीचे माजी शहराध्यक्ष जयदेव गायकवाड यांच्या हस्ते यावेळी महेश काळे यांचा सन्मान करण्यात आला .
नितीन कदम , अश्विनी कदम, यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते .
राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या “सूर निरागस हो” हया कार्यक्रमात त्यांच्या सुरेल गायनाने सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले.
या महोत्सवाच्या यशस्विते साठी ,महापालिकेचे अधिकारी तसेच , या भागातील कार्यकर्ते राजेंद्र डोंगरे, अनिल रांजणे, महादेव जाधव, धर्मेंद्र धावरे, सोमनाथ खंडाळे ,मिलिंद घोडके, मदन माळवे, राजेंद्र गरुड ,जयराज भोसले, अविनाश ननावरे आदींनी विशेष परिश्रम घेतले .
महेश काळेंच्या सुश्राव्य गायनाने शारदाबाई पवार कला महोत्सावाचा समारोप
Date:


