डॅमेज कंट्रोलसाठी शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Date:


कोल्हापूर दि. ६ एप्रिल – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणात उत्तम प्रकारे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ओळखले जातात. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील ‘ईडी’च्या कारवाईनंतर शरद पवार यांनी याच उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असावी, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा जो ससेमिरा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लागला आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही मंत्री सध्या जेलमध्ये आहेत. शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या आहेत, त्यासंदर्भात ही भेट झाली असावी.
केंद्रीय तपास यंत्रणा श्रीधर पाटणकर यांच्या माध्यमातून मातोश्रीच्या दारापर्यंत पोहोचल्या आहेत. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. पण ते राष्ट्रवादी काँग्रेसचे दूत आणि शरद पवार यांचे भक्त आहेत. या सर्व कारवाईचे गांभीर्य लक्षात घेऊन या तपास यंत्रणांच्या ससेमिरा संदर्भात ही भेट असू शकते. तसेच संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर हे सगळे कुठेतरी आपल्यापर्यंत पोहोचलंय, याची जाणीव शरद पवार यांनी झाली असेल. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये शरद पवार यांचा राजकीय तडजोडीचा उद्देश असू शकतो. शेवटी शरद पवार हे राजकीय डॅमेज कंट्रोलमध्ये माहीर आहेत, हे महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला माहीत आहे, मग तो भूकंप असो वा कुठलीआपत्ती आल्यास त्याचे निवारण करण्यामध्ये त्यांचे कौशल्य आहे असेही दरेकर यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या आजच्या भेटीला मी काही गांभीर्याने पाहत नाही. पवार हे एक खासदार व पक्षाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ शकतात. परंतु या भेटीचा अर्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा एकत्र येणार असा लावण्याचा काही आवश्यकता नाही.
काल रात्री दिल्लीमध्ये पवार यांच्या निवासस्थानी जे स्नेह भोजन आयोजित करण्यात आले होते. पण त्यामध्ये काही राजकीय गुपिते दडली असावीत असे मला वाटत नाही. राज्यामध्ये विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या काळात असे चहापान आयोजित करण्यात येत असते असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
राजकीय संस्कृतीचे एका बाजूला गुणगान गायचे व दुस-या बाजूला विरोधकांवर टिका करताना असभ्य व खालच्या पातळीवर भाषा वापरायाची हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. अखेर कुठल्या अतिरेकाचा शेवट होत असतो अशी टिकाही दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...