पुणे: भारताचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या शिफारशीवरून अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाचे प्रांतीय संयुक्त मंत्री, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ता उमेश मांडोत यांची नियुक्ती पुणे जिल्हा टेलीफोन सल्लागार समितीच्या सदस्यपदी झाली आहे.
नियुक्ती नंतर मारवाडी,गुजराती, जैन, अग्रवाल समाजाच्या अनेक उद्योगपती,व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी उमेश जैन मांडोत यांना शुभेच्छां दिल्या .नियुक्ती नंतर पत्रकारांशी बोलतांना, उमेश जैन मांडोत म्हणाले की, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवून मला हे पद दिले आहे त्या विश्वासास पात्र राहिल. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, सर्व आमदार, नगरसेवक आणि समाजाच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्ह्यातील सर्व बीएसएनएल टेलीफोन व मोबाइल धारकांच्या समस्या सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न करेन.बीएसएनएल संबंधीत सुचना व तक्रारीबाबत मला मो.9822099281 वर संपर्क साधू शकता.


