पुणे-ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यातील सिंहगड बंगला या ठिकाणी ठेवण्यात आले. पतंगराव कदम यांचे पार्थिव आता भारती विद्यापीठ धनकवडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले . साधारण एक ते दीड तासासाठी या ठिकाणी पतंगराव कदम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यातआले.. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील वांगी येथे असलेल्या सोनहिरा साखर कारखना येथे दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पतंगराव कदम यांचे पार्थिव सकाळी सात वाजेच्या दरम्यान पुण्यात पोहोचले. त्यांच्या सिंहगड बंगल्यावर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले .येथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सकाळीच पतंगराव कदम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याशिवाय काँग्रेसच्या आमदार आणि सुशिलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनीही पतंगराव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. पुण्यातील माजी खासदार सुरेश कलमाडी यांनीही सकाळीच कदम यांच्या सिंहगड बंगला येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,अविनाश बागवे,सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी , खासदार श्रीरंग बारणे यांनी या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. आमदार प्रणिती शिंदे, डॉ. के. एच. संचेती, डॉ. विश्वनाथ कराड, बुधाजीराव मुळीक, विद्या येरवडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, उल्हास पवार, विठ्ठलशेठ मणियार, आमदार जगदीश मुळीक, अभय छाजेड, अरविंद शिंदे, यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी पतंगराव कदम यांच्या अंत्यसंस्कारासाठी गर्दी केली होती. तसेच अनेक कार्यकर्त्यांचीही या ठिकाणी गर्दी जमली होती .
कदम यांच्या पार्थिवावर सांगलीतील वांगीमध्ये असलेल्या सोनहिरा साखर कारखाना परिसरात अंत्यसंस्कार होणार आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातून दुपारी पार्थिव सांगलीकडे रवाना होत आहे . येथे वांगीतील साखर कारखान्यात काही वेळ अंत्यदर्शन आणि 4 वाजेत्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.







