पुणे-
” वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांच्या व्यवस्थापन यंत्रणेसाठी ‘हेल्थकेअर’ ही खास प्रणाली तयार करून आयटी क्षेत्रातील ‘स्कॉर्ग’ या कंपनीने अल्पावधीतच मोठी झेप घातली आहे. यापुढेही वेगवेगळ्या क्षेत्रांची गरज लक्षात घेऊन अशा विविध कार्यप्रणाली निर्माण करण्याचा कंपनीचा संकल्प आहे अशी माहिती ‘स्कॉर्ग’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक धीरज जैन यांनी दिली.
‘स्कॉर्ग’ कंपनीचा सातवा वर्धापनदिन आणि स्वतः धीरज जैन यांचा वाढदिवस असा दुहेरी आनंद सोहळा कंपनीतर्फे शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला त्यानिमित्त पत्रकारांशी बोलताना धीरज जैन यांनी ‘स्कॉर्ग’ कंपनीच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. श्री धीरज जैन यांचे आधी मनोरंजन क्षेत्रात ‘प्रौडक्शन हाऊस’ होते. मात्र स्वतः धीरज जैन यांनी सात वर्षांपूर्वी पुण्यात आल्यानंतर ‘स्कॉर्ग’ कंपनी स्थापन केली आणि अल्पावधीतच आयटी क्षेत्रात या कंपनीने आपले स्वतंत्र वेगळे स्थान निर्माण केले. अर्थात कंपनीच्या या यशाचे श्रेय कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याचे आहे असे धीरज जैन यांनी यावेळी विनम्रपणे सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांच्या व्यवस्थापन यंत्रणेसाठी कंपनीने तयार केलेल्या ‘हेल्थकेअर’ या खास प्रणालीचा रुग्णालयांबरोबरच औषधी दुकानदारांनाही मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘स्कोर्ग’ कंपनीची पुणे, बंगळूर, हैदराबाद तसेच अमेरिकेतील टेक्सास येथे कार्यालये असून कंपनीतील सुमारे साडेपाचशेहून अधिक कर्मचारी एकाच कुटुंबातील सदस्य असल्यासारखे एकदिलाने काम करतात अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी धीरज जैन यांच्या सुविद्य पत्नी श्रेया जैन तसेच जैन कुटुंबातील मान्यवर आणि ‘स्कोर्ग’ कंपनीचे प्रमुख पदाधिकारी आणि अनेक कर्मचारी उपस्थित होते.