एसबीआयतर्फे भारत सरकारच्या कोव्हिड- 19 लसीकरण मोहिमेसाठी 11 कोटी रुपयांची मदत

Date:

मुंबई, 1 मार्च 2021 – सरकारच्या कोव्हिड- 19 लसीकरण मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला मदत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पीएम केयर्स फंडासाठी 11 कोटी रुपयांचे योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, ‘अशाप्रकारच्या संकटांच्या काळातच एकीचा खऱ्या अर्थाने कस लागत असतो आणि या महामारीशी लढण्यासाठी आपल्या देशाने जे प्रयत्न केले आहेत, त्यांचा सगळ्यांनाच अभिमान वाटायला हवा. या महामारीविरोधातले युद्ध अजून संपलेले नाही आणि एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक या नात्याने सर्वांचे लसीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. सर्वांनी पुढे येऊन लसीकरणाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शक्य त्या पद्धतीने मदत करावी अशी मी विनंती करतो.’

या वर्षाच्या सुरुवातीला एसबीआयने कोव्हिड- 19 विरोधातल्या लढ्यासाठी आपल्या वार्षिक नफ्याच्या 0.25 टक्के हिस्सा देण्याची बांधिलकी दर्शवत गरजूंना मास्क, सॅनिटायझर्स व इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करत लक्षणीय योगदान दिले होते. त्याशिवाय एसबीआय कर्मचाऱ्यांनीही या अभूतपूर्व संकटाच्या काळात राष्ट्राला पाठिंबा देण्यासाठी पीएम केयर्स फंडाला 107 कोटी रुपयांचे योगदान दिले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...