‘एसबीआय’ने गृहकर्ज व्यवसायात गाठला 5 लाख कोटींचा टप्पा

Date:

  •   गृहकर्ज विभागात 7 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचे बॅंकेचे नियोजन.
  •  मागील दशकात बँकेच्या गृहकर्जाच्या पोर्टफोलिओमध्ये 5 पटींची वाढ.
  •  बँक दररोज मिळवते गृहकर्जांचे सरासरी 1 हजार ग्राहक. 
  •  बॅंकेकडून गृहकर्जावर वार्षिक 6.80 टक्के प्रारंभिक व्याजदर.  
  •  गृहकर्जाविषयक चौकशीसाठी मिस्ड कॉलची सुविधा.   
  • पीएमएवायअंतर्गत दोन लाख गृहकर्जे मंजूर

मुंबई10 फेब्रुवारी 2021 : गृहकर्ज विभागामध्ये आपले नेतृत्व अबाधित राखत भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) गृहकर्जांच्या व्यवसायात 5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची अतुलनीय कामगिरी केली आहे. 2024च्या आर्थिक वर्षापर्यंत 7 लाख कोटी रुपयांच्या गृह कर्जांचे ‘एयूएम’ (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) साध्य करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. 

‘एसबीआय’च्या रिअल इस्टेट व गृहकर्ज व्यवसायामध्ये (आरईएचबीयू) गेल्या 10 वर्षांत 5 पटींनी वाढ झाली आहे. 2011मध्ये तिचा ‘एयूएम’ 89 हजार कोटी रुपये इतका होता, तो 2021मध्ये 5 लाख कोटी रुपये इतका झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर फटका बसला, तरीदेखील ‘आरईएचबीयू’ विभागाने गृहकर्जांच्या व्यवसायात मोठी वाढ साधली आहे. डिसेंबर 2020मध्ये गृहकर्जांमध्ये सर्वात जास्त सोर्सिंग, मंजूरी, वितरण आणि वाढ साध्य केलेल्या स्टेट बॅंकेने, आजवर कधीही केली नव्हती अशी भव्य कामगिरी केली आहे. गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱ्या नवीन ग्राहकांना गृहकर्जविषयक सर्व माहिती मिळू शकेल, अशी एक नवी सुविधा बॅंकेने सुरू केली आहे. यामध्ये संबंधित ग्राहकांना 7208933140 या क्रमांकावर केवळ एक मिस्ड कॉल द्यायचा असतो.

एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, “स्टेट बँक ऑफ इंडिया’ची ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. हा विलक्षण पराक्रम हा ग्राहकांचा बँकेवर असलेल्या सततच्या विश्वासाचा दाखला आहे. वैयक्तिकृत सेवेला तंत्रज्ञानाची जोड देणे ही सध्याच्या परिस्थितीवरील एक गुरुकिल्ली आहे, असे आम्हाला वाटते. गृहकर्जांचे वितरण अधिक कार्यक्षमतेने व्हावे, याकरीता विविध स्वरुपाचे डिजिटल उपक्रम सुरू करण्याचे काम बॅंक करीत आहे. यामध्ये ‘एंड-टू-एंड डिजिटल सोल्यूशन’ देणारा ‘रिटेल लोन मॅनेजमेंट सिस्टीम’ (आरएलएमएस) हा एक अनोखा ‘इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म’ विकसीत करण्यात येत आहे. गृहकर्जांबाबत एक विशिष्ट केंद्रित दृष्टिकोन स्वीकारून आणि राष्ट्रीय प्राधान्य म्हणून ते मान्य करून या बाजारपेठेत ‘एसबीआय’ अग्रगण्य झाली आहे, हे व्यक्त करताना आम्हाला आनंद होत आहे. देशाच्या प्रगतीमध्ये गृहकर्जेही हातभार लावीत असतात आणि ही कर्जे म्हणजे केवळ बॅंकेशी झालेले व्यवहार नसतात, असे आम्ही मानतो. आम्ही ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांचा आनंद वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत; जेणेकरुन बँक नव्याने उंची गाठू शकेल.”

आपले स्वतःचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना परवडणारी घरे सहजी उपलब्ध व्हावीत, याकरीता ‘एसबीआय’ निरंतर प्रयत्नशील आहे. व्यक्तींच्या गरजांनुसार गृहकर्जांची रचना बॅंकेने केली आहे. यामध्ये, नियमित गृहकर्ज, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘एसबीआय विशेषाधिकार गृहकर्ज’, सैन्यदले व संरक्षण खात्यातील कर्मचार्‍यांसाठी ‘एसबीआय शौर्य गृहकर्ज’, ‘एसबीआय मॅक्सगेन होम लोन’, ‘एसबीआय स्मार्ट होम’, विद्यमान ग्राहकांसाठी ‘टॉप-अप लोन’, ‘एसबीआय एनआरआय होम लोन’, जास्त रकमेच्या कर्जासाठी ‘एसबीआय फ्लेक्सीपे होम लोन’ आणि महिलांसाठी ‘एसबीआय हर-घर होम लोन’ असे प्रकार उपलब्ध आहेत.

पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) अनुदानावर प्रक्रिया करण्यासाठी ‘सेंट्रल नोडल एजन्सी’ (सीएनए) म्हणून गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने नेमलेली ‘एसबीआय’ ही एकमेव बँक आहे. ‘2022 पर्यंत सर्वांना घरे’ या शासनाच्या प्रमुख कार्यक्रमास हातभार लावण्यासाठी, ‘पीएमएवाय’अंतर्गत गृहकर्जांचे प्रमाण ‘एसबीआय’ सतत वाढवीत आहे. डिसेंबर 2020 बॅंकेने 1,94,582 गृहकर्जे मंजूर केली आहेत.

वार्षिक 6.80 टक्के इतक्या कमी व्याजदर आकारणाऱ्या ‘एसबीआय’ने गृहकर्ज विभागात 34 टक्के इतका वाटा बाजारपेठेत मिळवला आहे. दररोज सुमारे 1000 गृहकर्ज ग्राहक बॅंक सामील करून घेते. यातून परवडणाऱ्या घरांबाबत बॅंक किती कटिबद्ध आहे, हे दिसून येते. ‘एसबीआय’ने मंजूर केलेल्या प्रकल्पांसाठी गृहकर्जे घेणाऱ्या ग्राहकांना बॅंकेने मार्च 2021पर्यंत प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. गृहकर्ज व्यवसायाचा केंद्रित विकास, वाढीस चालना देण्यासाठी परिष्कृत विश्लेषण, ग्राहकांना गृहकर्जाची सहज सोपेपणाने उपलब्धता आणि गृहकर्ज वितरीत झल्यानंतरसुद्धा त्या ग्राहकांसोबत संबंध राखणे, अशा संकल्पनांवर बँक काम करीत आहे.

पुढील काळात ‘एआय’,’ क्लाउड’, ‘ब्लॉकचेन’, ‘मशीन लर्निंग’ या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याकडेही एसबीआय लक्ष देत आहे. या तंत्रज्ञानातून बॅंकेच्या गृहकर्ज व्यवसायालाच नव्हे, तर इतर व्यवसायांनादेखील मोठी चालना मिळेल. गृहकर्जांसाठी सह-कर्ज देण्याचे (को-लेन्डिंग) मॉडेल सुरू करण्यासाठी बँक तयार होत आहे. यातून  असंघटित क्षेत्रातील कर्जवितरणासही चालना मिळण्यास मदत होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाखांचे विस्तृत नेटवर्क, 215 केंद्रांमधील ‘सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर्स’ (सीपीसी), ‘योनो’ हा बँकेचा डिजिटल व जीवनशैलीविषयक प्लॅटफॉर्म आणि अन्य यंत्रणा यांच्या आधारे एसबीआयने गृहकर्जाच्या व्यवसायात 5 लाख कोटी रुपयांची मजल गाठली आहे.

घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांना घरांचे अधिक पर्याय देता यावेत, याकरीता बिल्डर्सशी सहकार्य वाढिण्यावर ‘एसबीआय’ भर देत आहे. ग्राहकांचा गृहकर्जाचा प्रवास अधिक नितळ बनविण्यासाठी बँक आपल्या कार्यकारी व वितरण प्लॅटफॉर्म्समध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाने सातत्याने सुधारणा करीत असते.

आतापर्यंतच्या काळात मंदीचा अनेकदा सामना करूनही, ‘एसबीआय’चा गृहकर्ज बाजारातील हिस्सा निरंतर वाढत आहे. त्याचबरोबर, बॅंकेच्या या विभागामध्ये सर्वात कमी डीफॉल्ट दर आहे. त्यातून मालमत्तेची उत्कृष्ट गुणवत्ता आणि त्याद्वारे बँकेच्या उत्पन्नात मोलाची भर पडत असल्याचेही दिसून येते. ‘एसबीआय’ने 2004मध्ये गृहकर्ज व्यवसाय सुरू केला. त्यावेळी तिचा पोर्टफोलिओ 17 हजार कोटी रुपयांचा होता. 2012मध्ये एक स्वतंत्र रियल इस्टेट आणि गृहनिर्माण व्यवसाय युनिट (आरईएचबीयू) अस्तित्वात आले. त्यावेळी एकूण पोर्टफोलिओ 1 लाख कोटी रुपयांचा होता. आर्थिक वर्ष 2014मध्ये गृहकर्ज बाजारात ‘एसबीआय’ने नेतृत्व प्रस्थापित केले. तेव्हापासून या व्यवसाय क्षेत्रात बॅंकेची वेगाने वाटचाल सुरूच आहे. त्यातूनच जानेवारी 2021मध्ये बॅंकेने 5 लाख कोटी रुपयांचा मैलाचा दगड ओलांडला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...

राष्ट्रीय कला उत्सवाला जल्लोषात सुरुवात

पुणे दि. २०: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी प्रस्तावित जागा खासगी विकासकाकडून परत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे महानगरपालिकेने विकासकास बांधकाम परवानगी नाकारणे हे स्मारकाच्या दृष्टिकोनातून...