शतक महोत्सवी सोबतीचा करार चा कैवल्य सोहळा रंगला….एक गायक,एक संगीतकार
पुणे:सोबतीचा करार मध्ये एकच कवी अर्थात कवी/गीतकार वैभव जोशी,एकच गायक दत्तप्रसाद रानडे,एकच संगीतकार आशिष मुजुमदार अशी ओळख असणारा कार्यक्रम म्हणजे सोबतीचा करार. एकाच कवी च्या मराठी,हिंदी,कविता,गझल चा कार्यक्रम सोबतीचा करार चा शतकमहोत्सवी ५ तासांचा कैवल्यसोहळा प्रयोग बालशिक्षण मंदिर येथे संपन्न झाला.. कार्यक्रमाची प्रस्तुती रसिक साहित्य आणि रसिक एंटरटेन्टमेंट यांनी केली असून मनोरंजनातून साहित्य प्रसार व्हावा हा उद्देश प्रामुख्याने समोर ठेवून सोबतीचा करार ची प्रस्तुत करत असल्याचे रसिक साहित्य ते संचालक शैलेश नांदुरकर ह्यांनी सांगितलें.
ग्रंथ मैत्री सर्वोत्तम मैत्री असे ब्रीद असणारे रसिक साहित्य ने साहित्य प्रसार आणि प्रचारार्थ औरंगाबाद,नागपूर,अमरावती,लातूर, कोल्हापूर,मुंबई सारख्या अनेक शहर,गावांतून सर्वत्र महाराष्ट्रातून ९९ प्रयोगांचे आयोजन केलेले असून शंभरावा प्रयोग पुण्यात विनामूल्य करत आहोत असेही नांदुरकरांनी नमूद केले.
सोबतीचा करार बरोबरच रसिक साहित्य ने कवी वैभव जोशी ह्यांचा पहिला कवितासंग्रह मी वगैरे नावाने प्रकाशित करून आजवर सर्वत्र मिळून जवळपास ३००० प्रतींची विक्रमी विक्री केली आहे. एखादा नवा कवितांना दर्जा असेल,रसिक मान्यता मिळत असेल तर
तर वाचकांपर्संत कविता पोहचविण्यासाठी सोबतीचा करार हे महत्त्वपूर्ण माध्यम ठरले आहे.. मी वगैरे ह्या पुस्तकाचे माध्यमांतर अर्थातच सोबतीचा करार हे नक्कीच ठरले आहे.
ह्याच शतकमहोत्सवी प्रयोगा निमित्त रसिक आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव सोबतीचा करार ची लाईव्ह कार्यक्रमाची ध्वनिमुद्रिका देखील प्रयोगातच प्रकाशित केली आहे.सोबतीचा करार ची धव्निमुद्रिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध होत असून
कवि वैभव जोशी ह्यांच्या प्रेम,नाते,वैचारिक अश्या विविध विषयांवर आधारीत मराठी,हिंदी कविता,गझल असणार आहेत.
नुकताच मुरांबा ह्या चित्रपटासाठी उत्कृष्ट गीतकार म्हणून महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त असणारे कवी/गीतकार वैभव जोशी ह्यांनी आंधळी कोशिंबीर,हायवे,प्यारवाली लव्हस्टोरी,अश्या अनेक ४० हून अधिक चित्रपटांसांठी गीतलेखन केलेले असून आगामी होम स्वीट होम अभिनेत्री रीमा लागू ह्यांच्या शेवटचा ठरलेला चित्रपटासाठी देखील गीतलेखन केले आहे टि व्ही वाहिनी वरील सूर नवा ध्यास नवा चे संहिता लेखन देखील करणारे वैभव जोशी ह्यांच्या सोबतीचा कारार मधील कवितांना अप्रतिम, ठेका धरायला लावणारे संगीतकार आशिष मुजुमदार एका प्रमुख काॅलेज मध्ये संगीत विषयाचे प्राध्यापक आहेत. गायक शंकर महादेवन ह्यांच्या आयुष्यातली पहिली गझल चे संगीत देणारे,तसेच राहुल देशपांडे,अश्या एक ना अनेक गायकांसाठी संगीतकार म्हणून काम पाहणारे आशिष मुजुमदारांचे संगीत ऐकायला मिळते.देशविदेशाता ख्याती प्राप्त असणारे,जेष्ठ गझल गायक उस्ताद मेहंदी हसन खाॅं चे शिष्य गझलसरा दत्तप्रसाद रानडे ह्याच्या वैयक्तिक मराठी,हिंदी,उर्दु भाषेतील गझल च्या हजारो मैफिली झालेल्या असून उत्कृष्ट शब्दफेक,स्पष्टोच्चार,ही त्यांची विशेष ओळख आहे.
सोबतीचा करार ची ध्वनिमुद्रकाचे ध्वनिमुद्रण स्व:त च्या मॅजिक नोट स्टुडिओ ची ओळख,आणि तौफिक कुरेशी ह्यांचे सोबत अनेक कार्यक्रमातून साथसंगत करणारे आमोद कुलकर्णी कार्यक्रमात तबला साथसंगत करत आहेत.पुण्यातील नामवंत प्रभात बॅंड चे संचालक,आणि अनेक नव रचनांसाठी संगीतकार,संगीतसंयोजन चे अनेक कार्यक्रमातून तरूण पिढीत स्थान निर्माण करणारे निनाद सोलापूरकर हे सोबतीचा करार मधून सिंथसाजेयर आणि सहगायन केले आहे.