रिअल इस्टेट क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२० उत्साहवर्धक नाही-सतीश मगर

Date:

पुणे-क्रेडाईचे नॅशनल प्रेसिडेंट श्री. सतीश मगर यांनी सांगितले, सरकारकडून तातडीच्या उपाययोजनांची गरज असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२० उत्साहवर्धक नाही.  स्थावर मालमत्ता उद्योगक्षेत्रासाठी विशेष अशा कोणत्याही तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत.  अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागत असलेल्या या उद्योगक्षेत्राला सरकारने प्रभावी पावले उचलावीत अशी आमची अपेक्षा होती.  अधिक लिक्विडीटी उपलब्ध करवून देणे, कर्जांचे वन टाईम रिस्ट्रक्चरिंग आणि घरखरेदीला चालना देण्यासाठी गृहकर्जांना कर सवलती अशा विशेष तरतुदी केल्या जाण्याची गरज होती.  परंतु परवडण्याजोग्या घरांच्या विकासकांसाठी आणि कर्ज मंजुरीसाठी कर सवलतीत एक वर्ष वाढवून देण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही मुद्द्याकडे लक्ष  देण्यात आलेले नाही ही दुर्दैवाची बाब आहे.  केंद्रीय अर्थसंकल्प २०२० मध्ये मागणी निर्मितीवर लक्ष केंद्रीत करत स्थिर आणि स्फूर्तिदायक आर्थिक उपाययोजना केल्या जाणे आवश्यक होते. या अर्थसंकल्पातून रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सध्या ५% असलेला वाढीचा दर २०२०-२१ मध्ये ६.५% इतका वाढवून उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देणे हा आहे जेणेकरून नवीन घरांसाठी मागणी वाढेल.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ईडीने अनिल अंबानींचे 3716 कोटी रुपयांचे 17 मजली घर केले जप्त : 40 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू

मुंबई-अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा...

अबब गुटखा विक्री प्रकरणी ५ वर्षांत १८ हजार आरोपी गजाआड ! २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त- मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

आमदार जगताप यांच्या विधानसभेतील तारांकित प्रश्नानंतर धक्कादायक माहिती उघडमुंबई...

बांधकाम साईट्सवर प्रदूषण सेन्सर बंधनकारक:’क्लिन एअर पोर्टल’ डॅशबोर्डचे लोकार्पण, पातळीवर लक्ष ठेवणार-महापौर मंजुषा नागपुरे

पुणे -शहरात बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल...

स्त्री जन्माचा दर कमी होतोय .. याची गंभीर दखल घेणार कधी ?आमदार जितेंद्र आव्हाड

स्त्री भ्रूण हत्या, गर्भलिंग चाचणी करणरे डॉक्टर,...