पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची कामे मार्गी लावण्याचे समाधान : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Date:

पुणे, ता. १० : श्री विठ्ठलाच्या कृपेने सर्व जनता सुखी राहो, रुक्मिणी मातेच्या कृपाशीर्वादाने सर्व माता भगिनिंचा समाधानाने प्रवास होवो. सर्व वारकऱ्यांच्या वारीचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होवो, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली आहे असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.पुण्यातील सुप्रसिद्ध निवडुंग्या विठोबा मंदिरात आज त्यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या समवेत दर्शन घेतले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘ पंढरपूर येथील रुक्मिणी मातेच्या चरणांची झालेली झीज पुरातत्व खात्याच्या सहकार्याने वज्रलेप करून घेता आली. राज्य शासनाच्या माध्यमातून ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात वातावरण खेळते राहण्यासाठी एकझोस्त पंखे बसविण्याची आणि गाभाऱ्यात पावसाचे पाणी येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक योजना करण्याच्या सूचना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. पालखीच्या मार्गावरील ८० टक्के रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे ही समाधानाची बाब आहे. यामुळे मनाला एक वेगळेच समाधान लाभत आहे.याबाबत पंढरपूर देवस्थान आणि जिल्हाधिकारी यांची एकत्र बैठक नुकतीच डॉ. गोऱ्हे यांनी घेतली होती.

पुण्यातील शिवसेनेचे स्थान भक्कम असून शिवसैनिकांचे कार्य नेहमीच उत्तम पद्धतीने सुरू असते अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.सांगली जिल्ह्यात वारकऱ्यांना झालेल्या अपघातात जखमी लोकांची चौकशी करून त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत स्व-निधितून डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.विठ्ठल मंदिरात यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी धनादेशाद्वारे देणगी दिली. डॉ. गोऱ्हे यांचा यावेळी विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी जेहलम जोशी, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, विभाग संघटक पुणे कॅन्टोन्मेंट श्री. मकरंद केदारी, विभाग संघटक संजय वाल्हेकर, ज्ञानेश्वर ख़ोळ, संतोष होडे, युवराज पारिख, महिला आघाडीच्या अनुपमा मांगडे, सुलभा तळेकर, विद्या होडे, श्रुती नाझीरकर उपस्थित होत्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’

राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन पुणे, दि २:...

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...

जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशी पेशवेपद मिळवणारे सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री...

ड्रोनमुळे बदलणार शेतीचे स्वरूप : अत्याधुनिक शेतीला सुरुवात

माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचे प्रतिपादन सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशनतर्फे 'महाराष्ट्र...