पुणे-सतगुरु फ्रूड प्राडक्टसच्या दालनाचे उद्घाटन पुण्यनगरीचे महापौर प्रशांत जगताप यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . सोमवार पेठमधील नरपतगीर चौकाजवळील पवित्रा एन्कलेव्हमध्ये या दालनाच्या उद्घाटन करण्यात आले . यावेळी सतगुरु फ्रुड प्राडक्टचे संचालक सुरेंदरपालसिंग छाबडा , चरणजितसिंग छाबडा , भोलासिंग अरोरा , दलीपकौर छाबडा , रविंदरकौर कक्कड , नरेन्दरकौर मुछल आदी मान्यवर उपस्थित होते .
या दालनामध्ये गायीच्या उत्तम दर्जाच्या ताजे दुध , दही , पनीर , लस्सी , ताक , बासुंदी आदी दुग्ध पदार्थ ग्राहकांना उपलब्ध राहणार आहेत . पाट्स येथे मोठ्या जागेमध्ये फार्म हाउस आहे , गेली १५ वर्ष दुग्ध व्यवसायात आईस्क्रीम विक्री करीत असल्याची माहिती सतगुरु फ्रूड प्राडक्टसचे संचालक सुरेंदरपालसिंग छाबडा यांनी दिले .



