सकारात्मक दृष्टिकोन मानवता प्रस्थापित करेल सद्गुरू माता सविंदार हरदेवजी यांचे प्रतिपादन
पुणे –
समाजात आज मानवामध्ये स्वार्थी भावना असल्याने गाक्त आपल्या स्वार्थासाठी जीवन जगले जात आहे, खऱ्या अर्थाने मानवता प्रस्थापित करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन मार्गदर्शक ठरतो. असे प्रतिपादन संत निरंकारी मिशन च्या सद्गुरू माता सविंदर हरदेवजी यांनी केले.
सासवड येथील जगताप ग्राउंड वर आयोजित भव्य निरंकारी सत्संग सोहळ्यात मार्गदर्शन करताना माताजी बोलत होत्या. हजारो निरंकारी समुदाय यावेळी उपस्थित होता. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, दिलीप यादव, बंडू जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नामदार शिवतरे यांनी आपल्या भाषणात निरंकारी मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली.
सद्गुरू माताजी पुढे आपल्या प्रवचनात म्हणाल्या,
प्राणी सुद्धा सहयोगाच्या भावनेने एकमेकांना सहकार्य करतात माणूस स्वार्थी व लालची बनत चालला आज, महात्मा गांधी आपल्या शब्दात सांगतात त्यांच्या शब्दात कि माणूस फक्त आपल्या लाभला महत्व देतो, सद्गुरू बाबाजीनी आम्हाला प्रेमाची भावना शिकविली, परमेश्वराचे आभार मानले पाहिजे कारण सुंदर जीवन बहाल केलेय, सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन जीवन जगले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या सृष्टीत मानवता प्रस्थापित होईल. सुत्रसंचलन भावेश आहिरे यांनी केले तर ताराचंद करमचंदानी यांनी आभार मानले.
भोसरी येथील सत्संग भवनाचे उद्धघाटन
सद्गुरू माता सविंदर हरदेवजी यांच्या हस्ते भोसरी येथील संत निरंकारी सत्संग भवन चे उद्धघाटन सद्गुरू माताजी यांच्या हस्ते संपन्न झाले, झोनल इंचार्ज ताराचंद करमचंदानी यावेळी उपास्थित होते.