Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

संजय राऊत यांना आणखी ४ दिवस ईडी कोठडी

Date:

मुंबई-शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन्स कोर्टाने यावेळी न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी वाढविली आहे.. मागील सुनावणीत न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सुनावणी दिली होती.त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.आज आणखी ४दिवसन्चि कोठडी देण्यात आली

पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला एक कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ईडीने या प्रकरणी मंगळवारी दोन ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. रोख रकमेच्या व्यवहारांबाबत पुरावे गोळा करण्यासाठी ही शोध मोहीम राबवली होती. लवकरच या प्रकरणाशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे.

कोर्टाने ईडीला फटकारले

याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. ईडी कोठडीत काही त्रास झाला आहे का असे राऊतांना कोर्टाने विचारले असता राऊत म्हणाले की, मला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले त्या ठिकाणी योग्य व्हेटिंलेश नाही असा आरोप राऊतांनी ईडीवर केला आहे. तर संजय राऊतांना आम्ही एसीमध्ये ठेवण्याचा दावा ईडीने केला आहे. यानंतर कोर्टाने ईडीला फटकार लगावली.

ईडीचे वकील : राऊतांच्या पत्नीला अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळाले. त्यामुळे वर्षा राऊत यांच्या सर्व खात्यांची चौकशी करीत आहोत.

ईडीचे वकील : वर्षा राऊत यांच्या खात्यात कोट्यावधींचे ट्रान्झेक्शन झाले.

ईडीच्या तपासात अजून काही व्यवहार समोर आले आहेत.

मनोज मोहिते (राऊतांचे वकील) : राऊतांना जबाब नोंदवण्यासाठी धमकावले जात आहे. फक्त दोन आरोप राऊतांवर आहे पण त्यात आधीच चौकशी झाली. आता कोठडीची गरज नाही.

स्वप्ना पाटकर : संजय राऊतांकडून धमकावले जात आहे.

न्यायाधीश: राऊत अटकेत असतील तर ते कसे धमकावतील.

  • 10 ऑगस्टपर्यंत कोठडी द्यावी अशी ईडीने मागणी केली होती.
  • सोमवारपर्यंत इतर लोकांची चौकशी करू-ईडी
  • राऊतांचे वकील मनोज मोहितेंकडून न्यायालयात युक्तीवाद

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...