पुणे-भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वात नाही. परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी NSCI,महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी सोमय्या यांनी केली आहे.
सोमय्या आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार केली. तिथून पालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी ते आले असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली आणि सगळा प्रकार घडला.
हल्ल्यावर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी स्वतः याची माहिती देत ट्वीट केलंय. ते म्हणाले, “माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात हल्ला केला आहे.”

