पुणे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावच्या घटनेची अत्यंत गंभीरतेने दाखल घेवून या घटनेस जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेवून त्यांना कडक शासन करण्यासाठी पावले उचलली असून याबाबत नागरिकांनी संयम आणि शांतता पालवी असे आवाहान खासदार संजय काकडे यांनी केले आहे . काय म्हटले आहे काकडे यांनी ते वाचा त्यांच्याच शब्दात ….
“कोरेगाव भीमा येथे झालेला प्रकार अत्यंत निंदणीय आहे. या प्रकाराची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. घडलेल्या या दुर्दैवी घटनेची चौकशी संपली नसताना त्याविषयी निष्कर्ष काढून समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्योग काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून सुरु आहेत. त्याचे राजकारण करण्याचा प्रकार सुरु आहे. त्यास आपण कुणीही बळी पडू नये. सर्व समाजाने शांतता व संयम बाळगण्याची गरज आहे. सोशल मीडियावर माथी भडकावणाऱ्या पोस्ट व अफवा पसरविल्या जात आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये. आपण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणारी लोकं आहोत. त्यामुळे जातीचा विखार पसरवून त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांवर आहे.”
– संजय काकडे
खासदार, राज्यसभा