पुणे-
महिलांनी आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. त्याप्रमाणे महत्त्वाच्या पदावर कार्य करुन योग्य प्रकारे जबाबदारी सांभाळत आहेत. म्हणूनच महिलांना समान संधी द्यायला हवी, असे मत आकांक्षा फौंडेशनच्या संचालिका आणि थरमॅक्सच्या माजी अध्यक्षा श्रीमती अनु आगा यांनी व्यक्त केले आहे.
सँडविक इंडिया डायव्हरसिटी ऍवॉर्ड प्रदान कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. श्रीमती अनु आगा आणि कौन्सुल जनरल ऑङ्ग स्वीडनच्या उटरिका सँडबर्ग यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यूएन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियाचे कार्यकारी संचालक श्री. कमल सिंग, सँडविक एशिया प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री पराग सातपुते व्यासपीठावर उपस्थित होते.
महिला दिन हा केवळ वर्षभरात एकच दिवस साजरा न करता रोजचा दिवस हा महिला दिन म्हणूनच साजरा करण्यात यावा अशी सूचना श्रीमती आगा यांनी केली.
यावेळी तृप्ती गोवेकर (असि. मॅनेजर गोदरेज ऍन्ड बोयसे कंपनी), सामाजिक कार्यकर्त्या वैशाली राणे, लीना केजरीवाल (संस्थापिका मिसिंग गर्ल्स), डॉ.पी.ए. रत्ना (प्राध्यापिका), विना जोशी (ङ्गोर्बस महिला), सुसिबेन शहा(लॅसिरेट फ्लीट प्रा.लि.संस्थापिका), श्री. हरीश सादानी (मावा संस्था संस्थापक सदस्य) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दीपप्रज्वलन झाल्यावर मुख्यकार्यकारी अधिकारी सँडविका ज्योत्स्ना शर्मा यांनी स्वागत केले तर श्री. पराग सातपुते यांनी प्रास्ताविकामध्ये पुरस्कारामागची भूमिका मांडली. श्री. सहर्ष डेव्हीड यांनी आभार मानले.