पुणे-लोकनेते गोपीनाथ मुंडे हे कर्तव्यकठोर होते,त्यांनी कायम संघर्षातून यश मिळविले मात्र ते अत्यंत हळव्या मनाचे होते.त्यांच्या समवेत काम करणाऱ्यांशी व त्या व्यक्तीच्या कुटुंबियांशी ही ते एकरूप होत,ते दौऱ्यावर असताना ही आवर्जून वेळ काढून कुटुंबियांशी संवाद साधत असत,अश्या आठवणी भाजप चे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री आणि सुमारे १५ वर्ष मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले रवी जी अनासपुरे यांनी सांगितल्या.मुंडे साहेब प्रचंड कष्ट घेत असत व एखाद्या विषयाचा ध्यास घेतला कि तो विषय पूर्ण करण्यासाठी ते सर्वस्व पणाला लावत असत,असे ही ते म्हणाले.आज मुंडे साहेबांच्या ६७ व्या जयंती निमित्त सौ मंजुश्री खर्डेकर यांनी एरंडवण्यातील खिलारे वस्तीत आयोजित केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेच्या घरोघरी प्रचार मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी कोथरूड भाजप चे अध्यक्ष प्रकाश बालवाडकर,नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे,प्रशांत हरसुले, चंद्रप्रभा खिलारे,संगीता आधवडे,प्रमिलाताई फाले,बागेश्री ठिपसे,सौ विद्या भरेकर,मधुरा नलावडे,सुवर्णा काकडे,विभीषण मुंडे,निलेश निढाळकर,नंदू शर्मा,लक्ष्मण मोरे इ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या संयोजक शिक्षण मंडळ सदस्य व बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेच्या सह संयोजक मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या ” मुंडे साहेबांचे आपल्या तिन्ही मुलींवर अतोनात प्रेम होते,त्यांनी आपल्या मुलींना शिकवून मोठे केले,त्यांच्या तिन्ही मुली ह्या उच्चं शिक्षित आहेत , त्यामुळे खरेतर मुंडे साहेब हे बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचे आदर्श आहेत.सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी खूप महत्वाची असून सर्वांनी याचा फायदा घ्यायला हवा असे सांगतानाच ” या योजने अंतर्गत मुलीच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत हे खाते उघडता येते,यासाठी कमीत कमी रक्कम १००० / रुपये असून त्यानंतरच्या ठेवी १००/ च्या पटीत असाव्यात,हे खाते उघडल्यावर यात १४ वर्षापर्यंत रक्कम जमा करता येते,” याचा सर्वांनी लाभ घ्यावा व या योजनेच्या माध्यमातून मुलींचे भविष्य सुरक्षित करावे असेही त्या म्हणाल्या,या योजनेचा प्रचार कोथरूड मधील सर्व वस्त्यांमध्ये करणार असून आज मुंडे साहेबांच्या जयंती दिनी याचा शुभारंभ करताना मनस्वी आनंद होत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
यावेळी डाक्टर वरदा बर्वे आणि विशाल सबनीस यांच्या टीम ने वस्तीतील मुलींना रुबेला चे मोफत लसीकरण केले.अंगणवाडीतील सेविका व शिक्षिका सौ जया काळे,सौ शीतल काळे,सौ सुनीता वाशिवाले,सौ उषा आवळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक मंजुश्री खर्डेकर यांनी केले,चंद्रप्रभा खिलारे यांनी स्वागत केले तर मधुरा नलावडे यांनी आभार प्रदर्शन केले.