दीनानाथ मंगेशकर रुग्णालय रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष संयुक्त पाहणी
पुणे-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले असून याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आज विविध खात्यातील अधिकारी आणि नागरिकांसह पाहणी केली .
यावेळी दीर्घकालीन उपाययोजनेत डी पी रस्त्यावरून (म्हात्रे पूल ते राजाराम पूल मार्गावरून) मंगेशकर रुग्णालयात जाण्यासाठी आखण्यात आलेल्या रस्त्याचा पाठपुरावा करुन तेथून लवकरातलवकर रुग्णालयात जाण्यासाठी चा मार्ग तयार करण्यासाठी पाठपुरावा व प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले.तर तोपर्यंत येथे नागरिकांनी केलेल्या सूचना अमलात आणण्याबाबत एकमत झाले.यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक प्रभाकर ढमाले,पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,मनपाच्या पथ विभागाचे राजेश फटाले,श्री पाडळे ,अतिक्रमण विभागाचे श्री तौर,स्थानिक नागरिक रवि आठवले, दत्तात्रय आठवले,सौ मधुरा रानडे(संदीप सो.च्या अध्यक्ष)सौ विभावरी ठकार( सेक्रेटरी,एरंडवणे सोसायटी.)विवेकानंद सोसायटीचे श्री आमोद प्रधान,श्री सदानंद ठोंबरे,श्री मेढेकर (चेयरमन )सौ वाणी
सौरभ चौधरी,संकुल सोसायटीचे डा.अलकनंदा भानू,श्री दयानंद पानसे,सुहास जोगळेकर,श्री प्रशांत वाघमारे,श्री संत,मीनल गार्डनचे सेक्रेटरी श्रीमती अनघा बेल्हेकर,श्री अमित बेल्हेकर,श्री संदीप तपस्वी,श्री चाटी,श्री गुप्ते,भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर पदाधिकारी कुलदीप सावळेकर,बाळासाहेब धनवे,राज तांबोळी,माणिकताई दीक्षीत,सुवर्णा काकडे,संगीताताई आदवडे इ उपस्थित होते.यावेळी खालील निर्णय घेण्यात आले व त्यास नागरिक,अधिकारी,दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रतिनिधी सचिन व्यवहारे,सेवासदन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राधिका ओगले दिलासा केंद्राच्या मेघना जोशी,यांनी सहमती दर्शविल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्याचे ठरले ….
१) हिमाली सोसायटी ते पटवर्धन बाग रस्ता नो पार्किंग झोन करणे व वाहतूक पोलिसांना रोज कारवाई करणे शक्य नसल्याने ट्रॅफिक वार्डन व नागरिकांनी नो पार्किंग मधील वाहनांचे फोटो पाठविल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करणे.
२) रुग्णालयात व सेवासदन शाळेत येणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहने आतील वाहनतळावर लावण्याबाबत प्रबोधन करणे व तसे फलक लावणे.
३) तेथील अतिक्रमणांवर कारवाई करणे.
४) रिक्षा स्टॅंड ची संख्या २० रिक्षांवरुन ५ करणे…..याचा समावेश आहे.
ह्या उपाययोजना त्वरित अमलात आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.