बागा सुस्थितीत राखणे शहराच्या आरोग्यासाठी महत्वाचे – शौनक अभिषेकी.
पुणे-शहरातील सर्व बाग सुस्थितीत राखणे व त्यांची उत्तम निगा राखणे हे शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांनी म्हटले आहे…नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या बजेट तरतुदीनुसार शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यानात स्प्रिंकलर बसविणे व अन्य विकास कामांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,मी ह्या बागेच्या उदघाटन समारंभास ही हजर होतो आणि आज यातील अनेक विकास कामांचे व स्प्रिंकलर बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे याचा आनंद वाटतो,आता सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन माझ्या वडिलांच्या (पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा) नावावर असलेले उद्यान खुले करावे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केलीयावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या ” बाग ह्या शहराची फुफ्फुसे असून त्यांच्यामुळे शहराचे सौंदर्य ही खुलते,बागांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा वावर असतो व येथे योगक्रिया,हास्यक्लब,व्यायाम यासह फिरायला ही नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात,या बागेत येणारे नागरिक विविध सूचना करत असतात ,या सूचनांनुसारच मी बजेट मध्ये तरतुदी टाकल्या असून नागरिकांनी सुचविलेल्या कामाचेच भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे असे ही त्या म्हणाल्या.ह्या बागेचे उदघाटन महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या हस्ते झाले होते आणि आज त्यांच्या जयंतीदिनी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन माझ्या विकासनिधीतून होत आहे याचा मला अभिमान वाटतो असे ही त्या म्हणाल्या.मुंडे साहेब नेहमी म्हणायचे कि लोकप्रतिनिधींनी नागरिकांना आवश्यक असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यावर भर द्यावा,त्यामुळेच मी प्रभागातील मोठ्या प्रकल्प/योजना यांच्या आधी नागरिकांनी सुचविलेली छोटी छोटी कामे करण्यावर भर दिला असल्याचे ही सौ मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी महानगर संघचालक बापू घाटपांडे,भैय्यासाहेब रुईकर,ताथवडे गार्डन ग्रुप चे पांडुरंग तावरे,सुनील नखाते,सौ वनिता ताथवडे ,नगरसेवक दीपक पोटे,जयंत भावे,प्रशांत हरसुले,बापूसाहेब मेंगडे,बाळासाहेब धनवे,राजेंद्र येडे,राज तांबोळी,सुयश गोडबोले,सुवर्ण काकडे,सुलभ जगताप,माणिकताई दीक्षित,एड प्राची बगाटे,सुधीर फाटक,सुशीला साठे,सतीश मोहिते,निलेश गरुडकर,नारायण वायदंडे,छाया सोनावणे,जगदीश डिंगरे इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले ” आमच्या नगरसेवकांनी चांगले काम केले तर त्यांचे कौतुक करा पण चुकले तर कान धरायचा अधिकार ही पुणेकरांचा आहे ,पुणेकरांनी आम्हाला जे भरभरून बहुमत दिले आहे त्याचा मान राखून शहर विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ही ते म्हणाले.बापूसाहेब घाटपांडे व भैय्यासाहेब रुईकर यांनी प्रभागातील चार ही नगरसेवक उत्तम समन्वय राखत चांगले काम करत असल्याचे सांगितले.गार्डन ग्रुप च्या वतीने सुनील नखाते यांनी नागरिकांच्या विविध कामांच्या अपेक्षांबद्दल ची माहिती दिली व ही सर्व कामे मंजुश्री खर्डेकर करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान ही लवकरच नागरिकांसाठी खुले होईल असे वचन नगरसेवक जयंत भावे,दीपक पोटे व मंजुश्री खर्डेकर यांनी उपस्थितांना दिले,
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले,भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे सरचिटणीस राज तांबोळी यांनी सूत्र संचालन तर प्रभागाचे सरचिटणीस राजेंद्र येडे यांनी आभार प्रदर्शन केले.