क्रीएटिव्ह फाऊंडेशन चे कार्य कौतुकास्पद – खा वंदना चव्हाण
क्रीएटिव्ह फाउंडेशन चे समाजकार्य वाखाणण्यासारखे असून राजकारणापेक्षा समाजकार्य श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन ना गिरीष बापट यांनी केलें.निवडणूकांच्या वेळी राजकारण मात्र इतर वेळी सर्वांनी एकत्र येउन समाजकार्य करावे असेही ते म्हणाले. तसेच एरंडवणे गावठाणातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यानी एकत्र येउन काम करण्याची संस्कृती स्पृहणीय असल्याचे ही ते म्हणाले. संदीप खर्डेकर २५ वर्षापेक्षा जास्त काळ समाजात काम करत असून कोणत्याही अधिकाराच्या पदावर नसतानाही ते पुणेकराना त्यांच्या कामाच्या माध्यमातून परिचित आहेत असे ही ते म्हणाले . खा वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतुन क्रीएटिव्ह फाउंडेशन ला देण्यात आलेल्या अंब्युलंस च्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते.या वेळी आ माधुरीताई मिसाळ,भाजप शहर अध्यक्ष योगेशजी गोगावले,संघटन मंत्री रवीजी अनासपुरे,माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर,शिवराम मेंगडे,मुरलीधर मोहोळ,दिलीप उंबरकर,गणेश घोष,दत्तात्रेय खाडे,मनसे चे मंदार बलकवडे,समीर बलकवडे ,कोंग्रेस चे मंगेश खराटे ,विशाल भेलके,शिवसेनेचे अजय भुवड ,उमेश भेलके ,ट्र्स्ट चे विश्वस्त मंजुश्री खर्डेकर,सतीश कोंडाळकर,देवेंद्र भाटिया,विनायक काटकर,ई मान्यवर उपस्थित होते. राजबाग तरुण मंडळाच्या वतीने विठ्ठलराव बलकवडे,मोहन शिगवण,संदीप मराठे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी अजय मारणे,भारत शिर्के,कुलदीप सावळेकर,सोमनाथ गुंड ,भारत कदम ,राजाभाऊ जोरी,सुशील मेंगडे ,दुष्यंत मोहोळ,अण्णा कराड,डा राजेंद्र खेडेकर,अशोक शेलार,गजानन माजिरे,निलेश गरुडकर,पी के कुलकर्णी,संतोष अमराळे,प्रमिला फाले ,संगीता आदवडे ,उल्का मोकासदार इ उपस्थित होते .
खा वंदना चव्हाण व महापौर प्रशांतजी जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.या वेळी बोलताना महापौर प्रशांत जगताप यांनी क्रीएटिव्ह कार्यक्रमास बोलावल्या बद्दल फाउंडेशन चे अभिनंदन व आभार व्यक्त केले. तसेच आम्ही नगरसेवकानी अश्या प्रकारचे कार्य केले पाहिजे मात्र असे न करता फक्त यावर्षीच्या बजेट मधुन ४ इंची लाईन १२ इंची केली किंवा तेच ते रस्ते पुन्हा पुन्हा डांवरीकरण केले अशी कामे न करता शहराच्या हितासाठीच निधी खर्च करावा. राडा रोडा उचलण्यासाठी निधी देउ व मनपा च्या शववाहिनी किंवा अंब्युलंस अत्याधुनिक करु असे ही ते म्हणाले.
वंदनाताई म्हणाल्या की माझा निधी हा जनतेचा असुन तो जनसेवे साठीच वापरण्याचा माझा मानस आहे.आणि क्रीएटिव्ह फाउंडेशन नी जेव्हा दोन छोट्या अंब्युलंस ची मागणी केली तेव्हा मी पक्षभेद विसरुन लगेच निधी देउ केला.संदीप खर्डेकर यांच्या भाषणाचा धागा पकडुन त्या म्हणाल्या की संदीप जी म्हणतात त्याप्रमाणे प्रशासकीय अधिकारी ऐकत नाहीत हे सत्य आहे आणि जनते समोर राजकारण्यांना रोषास सामोरे जावे लागते.मात्र महापौर उत्तम काम करत असून त्यायोगे अनेक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले,विशाल भेलके मंदार बलकवडे सुरेश जपे यांनी स्वागत तर मंजुश्री खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन केले .


