उत्सव साजरे करताना पर्यावरण रक्षणाचे भान ठेवणे गरजेचे – सौ मंजुश्री खर्डेकर…
सुवर्णरत्नं गार्डन सोसायटीची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा कायम –
टबात केले श्री गणरायाचे विसर्जन
पुणे-कर्वेनगर मधील सुवर्णरत्नं गार्डन सोसायटीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवून गणरायांचे विसर्जन मोठ्या टबात करून आदर्श निर्माण केला आहे,उत्सव साजरा करताना आपण पर्यावरण रक्षणाचे भान ठेवले पाहिजे व काही रूढी परंपरा बाजूला ठेवून काळानुसार बदल केलं पाहिजेत असे मत या सोसायटीच्या अध्यक्ष आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.विसर्जनापूर्वी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली,यावेळी सुवर्णरत्न गार्डन सोसायटीच्या अध्यक्ष /नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,सचिव स्मिता ढवळीकर,उत्सव प्रमुख सारिका फर्नांडिस,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर व सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार मेधा कुलकर्णी यांनी येथील रहिवाश्यांनी घेतलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले कि ” टबातील पाण्यात सोडियम बायकार्बोनेट घालून त्यात विसर्जन करण्याचा सोसायटीतील २०० सदनिकाधारकांनी घेतलेला निर्णय अनुकरणीय असून निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे,डॉल्बी चा कर्णकर्कश्श आवाज टाळून ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढणे अश्या छोट्या छोट्या कृतीतून या सोसायटीने पर्यावरण रक्षणाचा मोठा संदेश दिला आहे,असे हि त्या म्हणाल्या.सौ मंजुश्री खर्डेकर यांनी सोसायटीच्या रेन वाटर हार्वेस्टिंग,सी एफ एल दिव्यांचा वापर,कचरा विघटन प्रकल्प,आणि दार शुक्रवारी फळे व भाजीपाल्याच्या थेट विक्री व्यवस्था इत्यादी उपक्रमांची माहिती दिली व सर्व उपक्रमात सभासदांच्या सहभागाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.सचिव स्मिता ढवळीकर व उत्सव प्रमुख सारिका फर्नांडिस यांनी विविध स्पर्धांचे आयोजन,रोजची आरती व प्रसादातील सर्वांचा सहभाग याचा उल्लेख करून आदर्श गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.