पुणे-एखाद्या भागात सहकारी बँकांचा शाखा विस्तार होणे हे त्या परिसराच्या आर्थिक सुबत्तेचे व त्या परिसराच्या विकासाचे लक्षण असून पिंपरी चिंचवड भागात उद्यम विकास सहकारी बँकेच्या अधिकाधिक शाखा व्हाव्यात यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे वचन आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले.उद्यम बँक ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील बँक असून संघ संस्कारित स्वयंसेवक संचालक असून ते बँक चालवत असल्याने त्यांची समाजात विश्वासाहार्यता असून ते सचोटीने व्यवहार करतील अशी खात्री वाटते असे ही मा जगताप म्हणाले.चिंचवड गावातील केशवनगर काकडे पार्क येथे उद्यम बँकेच्या शाखेच्या स्थलांतर समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महापौर राहुल जाधव,बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर,संचालक महेश लडकत,दिलीप उंबरकर,पांडुरंग कुलकर्णी,मनोज नायर,सीताराम खाडे,राजन परदेशी,महेंद्र काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे,नगरसेवक अमोल थोरात,प्रमोद नसाल,विजय लांडे,शिवाजी शेडगे,विजय साबळे इ मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्यम बँकेमार्फत छोट्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध व्हावे आणि त्यांना बँकेचा आधार वाटावा असा व्यवहार व्हावा अशी अपेक्षा महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केली ,तसेच बँकेच्या प्रगतीसाठी मदत करू असे ही ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडताना समाजातील सर्व स्तरांना कर्ज उपलब्ध करून देऊ असे सांगितले.तसेच बँकेने १२५ कोटींचा टप्पा गाठला असून ७७ कोटी कर्जवाटप केले आहे व सातत्याने अ दर्जा मिळविला आहे असे ही ते म्हणाले.
ए टी एम,फ्रँकिंग,वीज बिल व एल आय सी प्रीमियम भरण्याची सुविधा,व सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून,बँकेच्या दहा शाखांमधून दैनंदिन व्यवहार चालतात असे ही संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले,सीताराम खाडे यांनी सूत्र संचालन तर पांडुरंग कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

