पुणे-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे महानगरच्यावतीने पुणे शहरात विविध ठिकाणी ” रास्ता रोको ” करून निषेध आंदोलन करण्यात आले . यामध्ये सकाळी समता सैनिकानी संतप्त होऊन पुणे सिंहगड रोडवरील सोनेरी आमदार रमेश वांजळे उड्डाणपुलाजवळ ” रास्ता रोको ” करून निषेध आंदोलन करण्यात आले .छगन भुजबळ यांच्यावरील कारवाई ही आकासाने तसेच राजकीय सूडबुद्धीने करण्यात आल्याचे यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे महानगर अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी सांगितले. समता परिषदेचे समता सैनिक या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.तसेच दुपारी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौकात समता सैनिकांनी निषेध आंदोलन केले . या आंदोलनात समता सैनिकांनी फडणवीस सरकारचा जाहीर निषेधात्मक काळ्या रंगाचे फलक धरले होते .
या आंदोलनात समता परिषदेचे पुणे महानगर अध्यक्ष प्रितेश गवळी , महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे , राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा रुपाली चाकणकर , प्रभावती भूमकर , पंढरीनाथ बनकर ,शिवराम जांभुळकर , सागर दरवडे , धनंजय बेनकर , सागर कोल्हे , समीर धाडगे , प्रदीप बनसोडे , राहुल कुदळे , संतोष कापरे , दत्तात्रय पाटोळे , मयुर कुदळे , अड. चंद्रशेखर भुजबळ , बंडू कचरे , दादा झुरुंगे व मोठ्या संख्येने समता सैनिक सहभागी झाले होते .


