पुणे-सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आज क्यूएलइडीमधील प्रमुख टीव्हीचे पुण्यात अभिनेत्री सागरिका घाटगे च्या हस्ते उद्घाटन केले. हा एक नावीन्यपूर्ण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्टाइलचा टीव्ही आहे.सॅमसंग क्यूएलइडी टीव्हीला `टीव्ही ऑफ लाइट असेही नाव देण्यात आले असून,क्यूएलइडी टीव्ही हा जगातील पहिल्या चार नावीन्यपूर्णत टीव्हींपैकी एक आहे. तब्बल सव्वा तीनलाखापासून ते २५ लाख रुपये किमतीत तो उपलब्ध करण्यात आला आहे .यामध्ये १००% कलरव्हॉल्यूम, एचडीआर २००० च्या प्रक्रियांचे लपलेले तपशील, इन्व्हिजिबल कनेक्शन्समुळे एक उत्कट अनुभव सादर करणारा टीव्ही आहे. याशिवाय टीव्ही नियंत्रित करणारा एक रिमोट कंट्रोल, नो गॅप वॉल माउंट आणि स्टुडिओ स्टँड लाइट अपसारखा पर्यायी असेल, ज्यामुळे आपल्या घराच्या सौंदर्यात वाढ तर होतेच शिवाय आपल्या बैठकीची खोली देखील मोकळी राहते. वजनाने हलका, बारीक आणि प्रामुख्याने मेटल बॉडी असलेला हा टीव्ही बेझेल लेस डिस्प्ले देतो. यामुळेच क्यूएलइडी टीव्ही सेट म्हणजे सुसंक्तपणाचे सर्वोच्च उदाहरण ठरत आहे.
याशिवाय सॅमसंग सर्वात नवीन फ्रेमही सादर करत आहे. कन्वेन्शनल टीव्हीसारख्या फेडिंग ब्लॅकमधून कलाकुसरीच्या सुरेख फ्रेममध्ये रूपांतर करण्यात आले असून, याच्या तब्बल 10 वेगवेगळ्या प्रकारांतून १००कला पर्यायांची निवड करता येते, यात लँडस्केप, आर्किटेक्चर, वाइल्डलाइफ, अॅक्शन, ड्रॉइंग आणि इतरही अनेक पर्यायांचा समावेश आहे. विविध पर्याय संलग्नित पणे देताना यात कला आणि रंगांची उत्तम सांगड घालण्यात आली आहे. तसेच सानुकूल असे बेझेल आणि ऐच्छिक स्टुडिओस्टँडसारखे अॅक्सेसरीचे पर्यायही देण्यात आले आहेत, आजच्या काळात आपली टीव्हीची दैनंदिन गरज वाढलेली आहे आणि त्यामुळेच भारतातील आमच्या मार्केटशेअरमध्येही वाढ झाली आहे, असे सॅमसंग इंडियाचे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बिझनेसचे उपाध्यक्ष श्री. राजीव भुतानी म्हणाले. यात क्यू पिक्चर, क्यू स्टाइल आणि क्यू स्मार्ट अशा तीन पॉइंटचा समावेश होतो.
यंदा सॅमसंगने आपल्या घरांच्या बैठकीच्या खोलीत सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने उपयुक्त अशा नव्या घटकांच्या टीव्हीचे सादरीकरण केले आहे. यामध्ये इन्व्हिजिबल कनेक्शन्स केबल असल्याने वायरींच्या जंजाळातून मुक्ती मिळते, यात एकमेव कॉर्ड यंत्रणा आहे. ग्राहकांना या डिझाइनमुळे घरातील जागेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येतो, आणि सर्व उपकरणे एकत्र ठेवता येतात, यामुळे बैठकीची खोली अधिक चांगल्या प्रमाणात सेट टॉप बॉक्स आणि इतर बाह्य उपकरणांनी भरून जात नाही. याशिवाय सॅमसंगने नो गॅप वॉल माउंट सादर केले असून, यामुळे टीव्ही भिंतीजवळ पूर्वीपेक्षाही अधिक जवळ लावता येतो. यात टीव्ही भिंतीवरच लावायला हवे असे काही नाही, तो तुम्ही सॅमसंगने दिलेल्या स्टँडवरही लावता येतो. ग्राहक कंपनीने पुरवलेले आकर्षक मेटल स्टँड वापरू शकतात किंवा स्टुडिओ स्टँड खरेदी करू शकतात, याची रचना इसेलसारखी करण्यात आली आहे
क्यू स्मार्ट : कंट्रोल डिव्हाइसेस अँड कंटेंट विथ वन रिमोट कंट्रोल
सॅमसंगचा हा टीव्ही एका रिमोटचा, ग्राहक एकाच वेळेस विविध टीव्ही उपकरणांवर नियंत्रण ठेवू शकतील असा आहे. सॅमसंगच्या या एका रिमोटमुळ आता उपकरणांबरोबरच स्मार्ट टीव्ही वैशिष्ट्यांमधील आवाजवरील नियंत्रणही शक्य होणार आहे.
याशिवाय सॅमसंगचा अत्याधुनिक स्मार्ट टीव्हीचे व्ह्यू अॅप वापरकर्त्यांना अमर्यादित संहिता शेअर करण्याचा अनुभव देते, ही संहिता स्मार्ट फोन वरून टीव्हीवर घेता येते. तुम्हाला नव्या स्मार्ट हब इंटरफेसच्या नव्या स्मार्ट व्हू अॅपमुळे वैयक्तिक अनुभव घेता येतो. नव्या व्ह्यू अॅप सपोर्टमुळे अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइल उपकरणांना पाठिंबा मिळतो.
क्यूएलइडी टीव्हीमध्ये क्यू9, क्यू8 आणि क्यू7 अशी सिरीज सादर केली जाणार आहे, यात अनुक्रमे 55 इंच (138 सेमी), 65 इंच (163 सेमी), 75 इंच (189 सेमी) आणि 88 इंच (223 सेमी) यांचा समावेश आहे, मे 2017 पासून ते उपलब्ध होऊ शकतील, तसेच यांची भारतातील किंमत 3,14,900 रुपये ते 24,99,900 रुपये या दरम्यान असेल.