मोदींना सत्तेवरून खेचण्यासाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा कॉंग्रेस राष्ट्रवादीला पाठींबा

Date:

पुणे- हा देश संविधानाने सांगितलेल्या लोकशाही मार्गाने चालला पाहिजे ही महात्मा फुले, शाहू
महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होवून पुरोगामी विचरांच्या चळवळीत
काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे हुकुमशाही प्रवृत्तीच्या आणि संविधान
आणि लोकशाही न मानणार्‍या नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कोंग्रेस-
राष्ट्रवादी कोंग्रेस आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या मागे उभे राहून त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने घेतला असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी
सांगितले.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. ‘लढाई लोकशाहीची, संविधानाच्या
अस्तित्वाची’ याचे आवाहन करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना या
मेळाव्याला निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे,
संभाजी ब्रिगेडचे मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर, प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, प्रदेश संघटक रमेश
हांडे, पुण्याचे अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सुधीर पुंड, पुणे जिल्हा संघटक
विशाल तुळवे, सचिन तावरे, विकास टिंगरे, प्राची दुधाने, डॉ. सुनीता मोरे यावेळी व्यासपीठावर
उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडचे मुखी समन्वयक शांताराम कुंजीर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा
राज्यातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन आघाडी कवडे गट, शेतकरी संघटना आणि मित्र
पक्षांच्या महाघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा आणि पुणे शहर लोकसभा मतदार
संघासाठी मोहन जोशी, शिरूर मतदार संघासाठी अमोल कोल्हे, मावळ मतदार संघासाठी पार्थ पवार
आणि बारामती मतदार संघासाठी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा ठराव मांडला त्याला उपस्थित
सर्वांनी मान्यता दिली. संभाजी ब्रिगेडच्या पाठिंब्याचे पत्र आणि ठराव कोंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे
यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केले.
प्रवीण गायकवाड म्हणाले, निवडणूक कोणाला तिकीट मिळण्यावर महत्वाची नसते. पक्षाचा विचार
महत्वाचा असतो, व्यक्ती महत्वाची नसते. त्यामुळे पुरोगामी विचारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व
मित्रपक्षांच्या पुण्यातून मोहन जोशी, बारामतीतून सुप्रिया सुळे, मावळ मधून पार्थ पवार आणि शिरूर
मधून डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने घेतला आहे.
लोकशाहित सर्वांची मते सर्वांना समजून घेणे आणि सर्वसमावेशक निर्णय घेणे हे गणराज्यसंस्कृतीत
होते. भारतात शिवाजी महाराजांच्या काळात लोकशाहील सुरुवात झाली. लोकशाहीमध्ये सर्वाना एकच
मत देता येते त्यामुळे समान अधिकार आले. बोलण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार आला. परंतु
आता बोलण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार धोक्यात आले आहे का? याचा विचार करण्याची गरज

निर्माण झाली आहे. डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्याकरण्यात आली. आज
पुरोगामी विचार सरणीच्या, प्रबोधन करणार्‍या जुन्या रूढी परंपराविरुद्ध लिहिणार्‍या आणि
बोलणार्‍या ६३ जणांना संरक्षण आहे मग खर्‍या अर्थाने लोकशाही आहे का? याचा विचार करण्याची
आवश्यकता आहे. निवडणुकीला मतदान करणे आणि निवडून येणे म्हणजे केवळ लोकशाही नाही.
सध्याची परिस्थती बघता लोकशाही धोक्यात आली आहे . एकीकडे संविधानाची प्रत जाळली आणि
दुसरीकडे मनुस्मृतिचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी केली जाते. आजही आरएसएसचे लोक
संविधान मान्य करत नाही आणि निवडून येऊन सत्तेवर येतात. संविधानाच्या माध्यमातून लोकशाही
प्रस्थापित झाली आहे. महात्मा फुलेंनी समता, शाहू महाराजांनी बंधुता, डॉ. आंबेडकरांनी न्याय आणि
शिवाजी महाराजांनी, स्वातंत्र्य दिले. सविधान महापुरुषाच्या विचारातून तयार झाले आहे.
लोकशाही आणि संविधान वाचले पाहिजे कारण लिहिण्याचा व बोलण्याचा अधिकार दाबून टाकला
जात आहे. समाजकारणातील काही उद्देश साध्य करण्यासाठी राजकारणात जावे लागते. संविधान व
लोकशाही वाचवण्यासाठी राजकारणात जावे लागते. सीबीआय, न्ययपालिका धोक्यात आली आहे.
रघुरामराजन यांनी राजीनामा दिला, उर्जितबपटेल यांनी नोटांबंदीला विरोध करत होते. तरी त्यांचे
ऐकले नाही. साडेपाच लाख छोटे उद्योग बंद झाले. काळा पैसा बाहेर आणायचा जो हेतू होता तो
साध्य झाला नाही.उलट १ लाख २६ हजार कोटी रुपयांचे सरकारचे नुकसान झाले हे. पेट्रोल, डिझेल,
गॅस स्वस्त होईल, महागाई कमी होईल, १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील असे संगितले.
परंतु हा चुनवी जुमला होता हे अमित शहा स्वतः सांगतात. नरेंद्र मोदींची प्रतिमा एक चहावाला अशी
निर्माण केली तोच एक जुमला आहे. प्रशांत किशोर यांच्या कल्पनेतून मोदींचीचहावाला ही प्रतिमा
तयार करण्यात आली. अत्यंत चतुर अत्यंत हुशार शहा, मोदी, गोध्रा दंगलीत आरोपी आहेंत. अशी
टीका त्यांनी केली. मोदी हे अपयशी पंतप्रधान आहेत. त्यामुळेच, शेतकर्‍यांच्या आत्महत्या,
बेरोजगारी, महागाई, याबाबत न बोलता पुलवामा घटनेचा संदर्भ देत राष्ट्रप्रेमाचा मुद्दा समोर आणत
आहेत. ज्या पंतप्रधानाला किंवा राष्ट्रपतीला जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येत नाहीत तो भित्रा
असतो आणि त्यातून तो हुकूमशहा होतो हा जगाचा इतिहास आहे असे त्यांनी संगितले.
रमेश बागवे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी शेतकरी, तरुण, कामगार, व्यापारी, सर्वसामान्य जनता यांना
फसवून देशात हाहाकार उडून दिला आहे. संविधान टिकले तर लोकशाही टिकेल आणि लोकशाही
टिकली तरच देश टिकेल याचा विचार सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. मोदी सरकारला सत्तेची
आणि पैशाची मस्ती आली आहे. त्यामुळेच त्यांच्या मंत्रिमंडळतील मंत्री ज्या म. गांधींची हत्या नथुराम
गोडसे यांनी केला त्याचे मंदिर बांधण्याची भाषा करतात. मोदी यांच्या कथणी आणि करणी मध्ये
फरक असून महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार ते मनात नाहीत हे त्यांच्या
कृतीतून आणि बोलण्यातून दिसतता अशी टीका त्यांनी केली.
.शांताराम कुंजीर म्हणाले, राज्यात मराठा क्रांतीचे ९८ मोर्चे निघाले. मुस्लिम, धनगर समाजाचे मोर्चे
निघाले. करोडो लोक रस्त्यावर आले. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात अडकून पडला
आहे. वकिलांची फौज उभी करू अशी भीमगर्जना चंद्रकांत पाटील यांनी केली. मात्र सक्षम वकिलांची

टीम दिसून येत नाही. याचा जाब सरकारला विचारला पाहिजे. करकर्त्यांवर गंभीर गुन्हे ते मागे
घेण्याचे आश्वासन दिले परंतु गुन्हे मागे घेतले नाही, शिवस्मारकाचे दोनवेळा पूजन परंतु ती मागणी
पूर्ण नाही. शाहूमहराजांच्या, डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. मुस्लिम, धनगर
समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांनी पायी मोर्चा काढला त्यांच्या मागण्या तशाच, लेखक,
विचारवंत, कलाकार यांना ते बोलल्यावर देशद्रोही ठरवले जाते आहे. त्यामुळे हे हुकुमशाही सरकार
हटवण्यासाठी निर्णय घ्यावा लागेल.पुरोगामी पक्षांना कशी मदत करायची याची दिशा ठरवावी लागेल.
मुख्यमंत्री फडणवीस ऐवजी गोडबोले असे नाव मुख्यमंत्र्यांचे ठेवायला पाहिजे. केवळ गोड बोलायचे
आणि आश्वासन दयायचे तीच पद्धत मोदींची आहे अशी टीका त्यांनी केली.
यावेळी विशाल तुळवे, प्रसन्न पाटील, अमोल काटे यांनीही आपले विचार मांडले. कार्यकर्माचे सूत्रसंचालन
रमेश हांडे यांनी केले तर आभार प्रदीप कणसे यांनी मानले. यावेळी बाळासाहेब अमराळे, हणमंत मोटे,
प्रफुल्ल गुजर पाटील, विश्वजित चौगुले, हर्षवर्धन मगदुम, संजय मते आदि मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...