पुणे- छत्रपती संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तात्काळ बसवा अन्यथा पुतळा बसवण्यास ‘संभाजी ब्रिगेड’ला परवानगी द्या..अशी मागणी करत आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली आणि संभाजी ब्रिगेड व अनेक शिवप्रेमी, विविध संघटना यांनी वारंवार मागणी करून सुद्धा ‘आयुक्त व महापौर’ चालढकल व वेळकाढूपणा बसवण्यासाठी करत आहेतअशी तक्रार केली .
छत्रपती संभाजी महाराज उद्यान हे फक्त छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे. उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचे उत्तम व आदर्श स्मारक करावे व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तात्काळ बसवावा… राजकारण व वेळकाढूपणा करत आहे… महापौर जातीयवादीपणा करून राजकारण करत आहेत. मनपा कारभाऱ्यांची पुतळा बसवावा हि इच्छा नाही. भाजप नेते संघाचा अजेंडा राबवतात म्हणून बहुजन महापुरूषांना डावलतात. यांना बहुजनांचा इतिहास मान्य नाही. तो डावलण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न सुरू आहे. मनपाने पुतळा लवकर बसवावा अन्यथा संभाजी ब्रिगेड यापुढे शिवनिती’ने आंदोलन होईल.छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या उद्यानात शंभूराजेंची नाटकांमधून बदनामी करणारा राम ग. गडकरीचा पुतळा असण्याचे कारण म्हणजे… इतिहासाचा विपर्यास आहे. नाट्यकर्मी अथवा कलाकारांना ते आदर्श असतील तर त्यांनी गडकरींचा पुतळा ‘बालगंधर्व अथवा अन्य ठिकाणी’ सन्मानाने बसवावा… मात्र संभाजी उद्यानात नको आहे. पुतळा तयार असून बसवला जात नाही. अंतर्गत राजकारणामुळेच पुतळा बसवला जात नाही. असे संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे .

