पुणे- कोरेगाव भीमा च्या प्रकरणात खरे दोषी एल्गार वाले आहेत आस आरोप संभाजी भिडे गुरुजींचे एक समर्थक पराशर मोने यांनी आज पुण्यात भिडे यांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलन समयी माध्यमांशी बोलताना केला .
प्रा.पराशर मोने म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच भिडे गुरूजी निर्दोष असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोरेगाव-भीमा दंगलीचे खरे गुन्हेगार कोण याचा पोलिसांनी शोध घ्यावा. गुरुजींच्या सन्मानार्थ मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारणे हे दुर्दैवी आहे. परंतू तरीही आम्ही त्यांच्या सूचनांचे पालन करणार आहोत. त्यामुळे आम्ही मोर्चा न काढता नदीपात्रात बसून आंदोलन करत आहोत.छत्रपतींचे आणि संत तुकारामांचे वंशज यांनीही पोलिसांना निवेदने दिली आहेत . असेही ते म्हणाले .