– २ जुलैला प्रदर्शित होणार सई, ललितचा ‘कलरफुल’-

Date:

मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे रसिकांना चित्रपटगृहांपासून लांब राहावे लागले. काही महिने चित्रपटगृहांचा अनुभव न घेतलेल्या प्रेक्षकांना २०२० वर्षाने जाता जाता अनलॉकचे गिफ्ट दिले. कोरोनाचा बसलेला हा विळखा जसा कमी व्हायला लागला तस तशी मनोरंजनसृष्टी चालू झाली आणि आता नवनवीन मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा, घोषणांचा सिलसिला सुरु झाला.

काही दिवसांपूर्वीच मराठीतल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘कलरफुल’ सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय सुंदर आणि रंगीन नाव असणारा हा सिनेमा घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २ जुलैला प्रेमाच्या पावसाने चिंब भिजवायला हा सिनेमा येत आहे. हे नवीन पोस्टर या प्रेमाच्या महिन्यात अतिशय सुखद अनुभव देणाऱ्या प्रेमाचे नवीन रंग उधळणारे आहे. अतिशय सुंदर, रोमँटिक धुक्यात हरवलेल्या ठिकाणी पायऱ्यांवर बसलेली सई आणि ललितची जोडी अतिशय मोहक दिसत आहे. प्रेमाने ओतप्रोत असलेले त्याचे डोळे आणि दोघांच्या कानावर लावलेले फुल हे या पोस्टरवर लक्षवेधक ठरत आहे. जस जसे या सिनेमाचे पोस्टर समोर येत आहे, तस तशी चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्कंठा वाढत आहे.

प्रकाश कुंटे दिग्दर्शित ह्या सिनेमाची निर्मिती मानसी आणि मुन्ना शकुल यांनी केली आहे. मानसी ह्या मुखत्वे हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत असून हा सिनेमा मानसी यांच्या यंत्रा पिक्चर्स आणि मुन्ना शकुल यांच्या शकुल शोबिझ या दोन्ही बॅनरच्या सहयोगाने सादर होणार आहे. यानिमित्ताने यंत्रा पिक्चर्स बँनरच्या मानसी सांगतात, ” मला यंत्रा पिक्चर्स आणि शकुल शोबिझ यांच्या एकत्रीकरणामुळे खूप आनंद होत आहे. आता आम्ही मिळून लवकरच हिंदी, मराठी आणि गुजराती सिनेमे प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. आमची मराठी चित्रपटांची सुरुवात ‘कलरफुल’ सिनेमाने होत असल्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. यंत्रा पिक्चर्स, शकुल शोबिझ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने २ जुलैला प्रदर्शित होणारा हा सिनेमा नक्कीच सर्वाना प्रेमाचा एक वेगळा रंग दाखवेल यात शंका नाही.” यावर्षी यंत्रा पिक्चर्स आणि शकुल शोबिझ मराठीसह गुजराती चित्रपट आणि वेबसिरीज सुद्धा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...

आत्मचरित्र लिहिण्यास बंदी हि तर विचार स्वातंत्र्याची गळचेपी, स्वातंत्र्यावर गदा: अनंत गाडगीळ

मुंबई:माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाचा संसदेत उल्लेख झाल्यांनतर...

रेड जायंट मूव्हीजच्या ‘KHxRK’मुळे 47 वर्षांनंतर कमल हासन आणि रजनीकांत एकत्र

रेड जायंट मूव्हीजच्या आगामी चित्रपट ‘KHxRK’ मुळे भारतीय चित्रपटसृष्टी...