Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सर्व भाषांच्या संयुक्त संमेलनासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा-गुलजार

Date:

ग्यानबा तुकाराम साहित्य नगरी, पिंपरी/ सुकृत मोकाशी

भारतात अनेक भाषा आहेत. भाषांचे वेगवेगळे साहित्य महोत्सवही भरविले जातात. मात्र, या सर्व भाषांचे मिळून एक संयुक्त संमेलन व्हावे. या संमेलनात विविध भाषांतील तज्ञ, साहित्यिक, वक्ते यांनी आपले विचार मांडावेत आणि यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि गीतकार गुलजार यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. दरम्यान, तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने पुस्तके उदास झाल्याची खंत गुलजार यांनी मुलाखतीत व्यक्त केली.

89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गुलजार म्हणाले, यापूर्वी मी एकदा मराठी साहित्य संमेलनाला हजर राहिलो आहे. त्यावेळी साधारणपणे पन्नास हजार रसिक उपस्थित होते. आपल्या मातृभाषेवर प्रेम करणारे हे लाखभर रसिक पाहून मी थक्क झालो. भारतात खूप भाषा आहेत. पण त्या भाषांमध्ये भरणारे अशा प्रकारचे संपन्न आणि वैभवशाली संमेलन मी पाहिले नाही. मातृभाषेचे प्रेम काय असते, हे मी येथे अनुभवतो आहे. आपला देश हा विविधरंगी भाषांनी समृद्ध आहे. त्या त्या भाषांमध्ये साहित्य महोत्सव भरविले जातात. पण, या सर्व भाषांचे मिळून एक संयुक्त साहित्य संमेलन देशात व्हावे, ही माझी इच्छा आहे. यासाठी मी बनारसला प्रयत्नही केला. आजही माझी ही इच्छा अपुरी आहे. हे संमेलन पाहता महाराष्ट्राने यासाठी पुढाकार घ्यावा, असे वाटते.

कालिदास का नाही?

मला इंग्रजीशी वैर नाही. पण, शेक्सपिअर, मिल्टन शिकवत असताना कालिदासाकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. ते आपल्याकडे शिकविले जात नाही. आपल्या मुळांशी घट्ट राहणे आवश्यक असते. मराठी साहित्याचे अनेक भाषांत भाषांतर होते. मात्र, मराठीत इतर भाषेतून काही येतेय का, हे पाहायला हवे.

बालसाहित्याची वानवा

देशात बालसाहित्याची वानवा आहे. समृद्ध असे बालसाहित्य आपल्याकडे नाही. †िंहंदीतही पाश्चिमात्यांचे भाषांतर केलेले साहित्य आहे.

लेखक की आवाज चुप्प नहीं रहती,

वो खास्ताँ भी है तो शब्द उडते है मुँहसे

शहर को साफ रखना और मुश्किल हो गया है,

चौराहे पर बात चल रही है

वो लेखकही होगा….

अशा शब्दांत यावेळी गुलजार यांनी साहित्यिकांची महती विषद केली.

मुलाखतीत गुलजार यांचे काव्य रसिकांना अनुभवायला मिळाले.

ािंकिताबे झाकती है, बंद अलमारी के शिसो से

बडी हसरत से सिखते है, महिनो और मुलाखते नही होती…

बडी बैचैन हो गई है किताबे, निंद मे चलने की उनको आदत हो गई है…

ही नज्म पेश करीत गुलजार यांनी सोशल मीडियायामुळे पुस्तके उदास झाली आहेत, नाती दुरावत चालली आहेत, अशा शब्दात खंत व्यक्त केली. मुलाखतकार अंबरीश मिश्रा यांनी त्यांना मुलाखतीतून बोलते केले. उत्तरोत्तर ही मुलाखत रंगत गेली.

गुलजार म्हणाले, मी जेव्हा लिहीतो तेव्हा ते संवाद साधण्यासारखे आहे का, हे तपासून पाहतो. सिनेमा लोकांपर्यत पोहोचतो. पण, त्याच्यातही कॅटॅगरीज आहेत. मनात राहिली, की कविता तयार होत नाही. ती आतल्या आत तुम्हाला खात राहील.

…म्हणूनच कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद केला

कुसुमाग्रज यांच्या कवितांचा आशय चांगला आहे. त्या हिंदीत पोहोचल्या नाहीत. त्या मला आवडल्या. या कविता इतरांपर्यंत पोहोचाव्यात म्हणूनच त्यांच्या कवितांचा अनुवाद केला. कविता जिंदगी शेअर करते.

सर मुझे पहचाना क्या.. बारीश मे कोई आ गया है

कपडे कुछ मुछडे हुए… बाल भी भिगे थे…

कुसुमाग्रज यांच्या कणा या कवितेचा अनुवाद ऐकवून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

ािंसिनेमांमधील गाणी करणे अधिक अवघड

कवितांपेक्षा सिनेमातील गाणी करणे अधिक अवघड आहे. कारण सिनेमाच्या कहानीवर आधारित गाणी लिहायला लागतात. टय़ून बनविलेली असते. त्याच मीटरमध्ये गाणी लिहायला लागतात. सिनेमामधील गाणी करणे म्हणजे दुसऱयाच्या गायीला चारा नेऊन खायला घालण्यासारखे आहे, असेही त्यांना सांगितले. मी बेताल आणि बेसुरा दोन्ही आहे. पण, मीटरवर गाणी बनवू शकतो, असे सांगताच सभागृहात हशा पिकला. माझ्यामध्ये आजही 100 टक्के आत्मविश्वास नाही, अशी प्रांजळ कबुलीही गुलजार यांनी या वेळी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...